आज जरांगे पाटलाच्या उपस्थितीत मांजरसुंबा चौकात मराठा समाजाची इशारा बैठक
बीड — मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह समाज बांधव दि. २७ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच करणार आहेत. दि.२९ ऑगस्टला मुंबईत दाखल होण्याच्या अनुषंगाने मराठा समाज बांधवांकडून जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान मुंबईला निघण्यापुर्वी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज रविवार दि.२४ ऑगस्ट रोजी मांजरसुंबा तालुका बीड येथील चौकात अंतीम निर्णायक बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीची तयारी पूर्ण झाली असून बैठकीचे नाव इशारा बैठक असले, 29 ऑगस्ट च्या आंदोलनाच्या दृष्टीने ही तयारी करण्यात येत आहे. या बैठकीतून मनोज जरांगे पाटील सरकारला काय इशारा देतात? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मांजरसुंबा येथे आज होणाऱ्या बैठकीसाठी जिल्हाभरातील सर्व मराठा सेवक, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, मुंबईला निघण्यापुर्वी होणाऱ्या बैठकीत जरांगे पाटील समाजाला काय आवाहन करतात ? मुंबईतील आंदोलनाच्या पाश्र्वभुमीवर राज्य सरकारने मंत्र्यांची उपसमिती गठीत केली आहे. याबाबत जरांगे पाटील काय बोलतात ? याकडेही राज्याचे लक्ष लागलेले आहे.

