बीड — परळीचे व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृन हत्येला पंधरा महिने होऊन गेल्यानंतर तपासा संदर्भात पोलिसावर दबाव वाढला अखेर कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी पाच सदस्यीय पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
दोनच दिवसांपूर्वी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पोलिसांना आठ दिवसाचा वेळ दिला असून आरोपी अटक झाली नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी स्पष्ट केले.अशातच आता याप्रकरणी बीड पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. नवनीत कॉवत यांच्याकडून महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये एक पोलीस निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल यांचा समावेश असेल.एलसीबीचे पीआय म्हणून काम केलेले संतोष साबळे यांच्यासह चार कॉन्स्टेबल आता महादेव मुंडे खून प्रकरणाचा उलगडा करतील. उशिरा का होईना पण पोलिसांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकीकडे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांवर दबाव वाढत आहे. तर दुसरीकडे महादेव मुंडे प्रकरणी देखील पोलिसांवर दबाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. या दोन्ही प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

