वाढदिवस साजरा न करण्याचे आ.क्षीरसागरांकडून आवाहन
बीड — संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) होत असलेल्या अंतिम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा न करता आंदोलनात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईला चला, याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर Sandeep kshirsagar यांनी केले आहे.
२७ ऑगस्ट रोजी आ.संदीप क्षीरसागर यांचा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आणि कार्यक्रम घेऊन कार्यकर्ते वाढदिवस साजरा करत असतात. परंतु यावर्षी मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठीची ही शेवटची लढाई आहे. त्यामुळे माझा वाढदिवस साजरा न करता, सध्या संपूर्ण लक्ष आंदोलनावर ठेवून त्यासाठी जोमाने परिपूर्ण तयारी करा आणि संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांच्या नेतृत्वाखाली दि.२९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई Mumbai येथे होत असलेल्या ऐतिहासिक आंदोलनास बहुसंख्येने, एकजूटीने मुंबईला चला. याच माझ्या वाढदिवसाच्या मला शुभेच्छा असतील. असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

