Sunday, December 14, 2025

मतदारसंघातील रस्त्यांसह विविध विषयी आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली बैठक

बीड — बीड मतदारसंघातील रस्ते तसेच विविध विषयांच्या संदर्भात आ.संदीप क्षीरसागर यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत नगर रोडवरील डिव्हायडर व रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करणे, राजुरी ते खरवंडी रस्त्यावरील पुलाचे रखडलेले काम, लिंबागणेश-मांजरसुंबा रस्त्यावरील जाधव वस्तीजवळ साठत असलेले पाणी, बिंदुसरा नदीवरील पूल कम बंधार्‍याचे संथगतीने होत असलेले काम, बीड शहरातील बार्शी रोडवर असलेला राष्ट्रवादी भवन समोरील मोठा खड्डा दुरूस्त करणे तसेच नगरपरिषदेकडून शहरात सुरू असलेल्या स्वच्छता काम व पाणीपुरवठा या विविध विषयांचा आ.संदीप क्षीरसागर यांनी आढावा घेतला.
                  मतदारसंघातील बीड शहर आणि ग्रामीण भागातील रस्ते, पूल आणि विविध त्यासंबंधित विविध विषय तसेच शहरातील पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांच्या संदर्भात आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.२) रोजी बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत नुकत्याच नवीन झालेल्या नगर रोडवरील दुभाजकांवर आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण करणे, नवगण राजूरी येथे खरवंडी ते राजूरी रस्त्यावरील पूलाचे रखडलेले काम, लिंबागणेश ते मांजरसुंबा रस्त्यावर जाधववस्ती जवळ पाणी साठते यावर मार्ग काढणे, बीड शहरात बिंदुसरा नदीवर बंधारा कम पुलाचे काम संथगतीने सुरू आहे या कामाची गती वाढवणे, बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवन समोर पडलेला मोठा खड्डा दुरूस्त करणे तसेच बीड शहरात सुरू असलेल्या स्वच्छता काम आणि पाणी पुरवठ्याच्या कामांचा आ.संदीप क्षीरसागर यांनी आढावा घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी माजी आ.सय्यद सलीम तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 
नगर रोडवर रस्ता क्रॉंसीगसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात बैठक
नगर रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा न्यायालयाकडे जाण्यासाठी रस्ता क्रॉसिंग असणे नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सर्व स्तरांतून मागणी होत आहे. यासंदर्भात आ.संदीप क्षीरसागर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. काही दिवसांपूर्वीच आ.क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती‌‌. त्यानंतर आता मा.जिल्हाधिकारी यांच्या दालनात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने नगर रोडवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा न्यायालयासमोर रस्ता क्रॉसिंग करण्याची आग्रही मागणी आ.क्षीरसागर यांनी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles