बीड — बीड शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते सत्येंद्र पाटील यांची तर उपाध्यक्षपदी हाजी इनामदार यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वागत सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राजेंद्र मस्के, प्रा.विजय पवार, मिरगणे सर, माजी प्राचार्य अनंत नखाते सर, ज्येष्ठ शिक्षक नेते कल्याण वाघमारे सर, रामनाथ डाके सर, अप्पासाहेब रसाळ सर बाळासाहेब गोरे, अशोक रोमण, बंडु कदम, झुंजार धांडे, राजेंद्र साळुंके, जयमल्हार बागल, विशाल तांदळे, दिपक हजारे, मिठ्ठन कोटुळे, दत्ता साळुंके, अभय बीडकर, सचिन हरनमारे, वल्लभ चिरके, गणेश लोंढे, अभिजीत मसकर, पप्पू लांडे, दत्ता कशिद, सुरेश खुर्णे, वामन घोडके, महेंद्र शिराळे यांच्यासह अनेक शिवप्रेमींची उपस्थिती होती.
बीड शहरात गेल्या काही वर्षापासून अत्यंत उत्साहात सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. सबंध बीडकर नागरिक या शिवजयंती सोहळ्यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी होत असतात. यंदाही बीडचा हा सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळा आ. संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व सहकारी, पदाधिकारी, मित्र परिवाराच्या वतीने अत्यंत आनंददायी वातावरणात उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड तसेच शिवजयंतीच्या अनुषंगाने चर्चा व विनिमय करण्यासाठी आणि शिवजयंती उत्सवामध्ये यावर्षीच्या आयोजित कार्यक्रमासंबंधी निर्णय घेण्यासंदर्भात दि. 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता शहरातील शासकीय विश्रामगृहात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती कार्यकारिणीच्या व्यापक बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. आ. संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते सत्येंद्र पाटील यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी हाजी नसीम इनामदार यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीला शिवप्रेमी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित होते.

