बीड पोलिस दलात आडनावाने नाही तर नावानेच हाक मारावी लागणार

बीड — जिल्ह्यातील सामाजिक परिस्थिती बदलली असल्याने कायदा सुव्यवस्थेत समाज घटकातील तणाव उफाळून येत आहे. सामाजिक घटकांबरोबरच पोलिस दलातील सलोखा कायम ठेवण्यासाठी आणि मतभेद व मनभेद टाळण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी पुढाकार घेतला आहे.

पोलिस दलात यापुढे एकमेकांना हाक देताना आडनाव नाही तर नावाने हाक दिली जाईल. तसेच, कर्तव्यावर असताना रील्स काढण्यावरही पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी निर्बंध घातले.

अनेकदा आडनावाच्या उच्चारावरून जाती बोध होतो. हे टाळले जावे यासाठी नावानेच हाक देण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक कॉवत यांनी दिल्या आहेत‌ नावाने हाक दिल्याने आपुलकी व जवळीक वाटते, असेही त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी यापुढे सगळ्या प्रकारची जबाबदारी ठाणेदारांचीच असेल. ठाण्यातील कोणावरही लाचलुचपतची कारवाई झाली, तर त्यालाही ठाणेप्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल.
रील्सचे फॅडही सर्वत्र वाढले आहे. पोलिस खात्यातसुद्धा कर्मचाऱ्यांपासून अधिकारीही रील्स काढण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशांनाही नवनीत कॉवत यांनी तंबी दिली आहे. कर्मचाऱ्यांनी ऑन ड्युटी रील्स काढली तर त्याच्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles