Sunday, February 1, 2026

बीड जिल्ह्यात १८ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी; गोदाकाठच्या गावांना इशारा, 32 गावांना पुराचा धोका

बीड — जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात पावसाने उसंत घेतली होती. मात्र मागील २४ तासात झालेल्या पावसामुळे १८ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बीडच्या गेवराई आणि शिरूर कासार तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला असून यामुळे खरिपाच्या पिकांचे यामुळे नुकसान झाले आहे.

जिल्हयातील या १८ महसूल मंडळात झालेली अतिवृष्टी

बीड तालुका राजुरी ७७.३ मिमी, नाळवंडी ७४.३ मिमी, चहऱ्हाटा ७७.३ मिमी, पारगाव सिरस ७७.३ मिमी,

पाटोदा तालुका – पाटोदा ६७.८ मिमी, थेरला ८६.८ मिमी

गेवराई तालुका – धोंडराई १९८. मिमी, उमापुर १३९.३ मिमी, रेवकी १४३ मिमी, तलवाडा ९४ मिमी, गेवराई ८८ मिमी, चकलांबा १३१.८ मिमी

परळी तालुका – पिंपळगाव ८०.८ मिमी

शिरूर कासार – शिरूर ९१.५ मिमी, रायमोहा १२१.८ मिमी, ब्रम्हनाथ येळंब १०९ मिमी, तिंतरवणी १००.८ मिमी, खालापुरी ९६.५ मिमी,
दरम्यान अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळामध्ये काढणीला आलेल्या खरिपांच्या पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे.प्रामुख्याने सोयाबीन,कापूस,मूग या पिकांचे प्रामुख्याने नुकसान झालेले आहे. पैठण येथील जायकवाडी धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी नदीला पूर आला असून नदी तीरावरील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे असलेले शनी मंदिर पुन्हा एकदा पाण्याखाली गेले आहे. प्रशासनाकडून गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जायकवाडी धरणातून शनिवारी रात्री पासूनच नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. पाणीपातळी वाढल्यास गेवराई तालुक्यातील गुंतेगावं, बोरगांव, पाथरवाला, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळसपिपंळगावं, नागझरी, खामगाव, आगरनादुंर, पांढरी, मिरगावं, पागुळगावं, राजापुर, रामपुरी, भोगलगावं आदि गावांना पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता आहे.

माजलगाव धरणातून सिंधफणा नदीपात्रात विसर्ग

माजलगाव येथे असलेल्या धरणातून धरणाचे १० वक्र दरवाजे ०.८० मीटरने वर उचलत सिंदफणा नदी पात्रात ३१ हजार ३३५ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. माजलगाव धरणातील सोडण्यात आलेले पाणी आणि गोदावरीतील पूरस्थितीमुळे सिंदफणा नदीची पाणी पातळी वाढल्याने माजलगाव, मंजरथ व ढालेगाव नदीकाठच्या गावामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 32 गावांना पूर परिस्थिती चा सामना करावा लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने तसे सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles