Sunday, December 14, 2025

बीड : आदित्य जीवने यांची बदली;मुरूगनंथम् एम. नवे सीईओ

बीड — स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मुरूगनंथम् एम. हे जिल्हा परिषद चा कारभार पाहणार आहेत.
जि प चे सीईओ आदित्य जीवने यांची वीज वितरण कंपनीच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदी छ. संभाजीनगर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगनंथम एम हे बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आले आहेत. याबरोबरच नितीन पाटील हे कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता आयुक्तपदा वरून महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कारभार पाहणार आहे ‌. एबी धुळाज यांची कापूस उत्पादक विपणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून ओबीसी बहुजन कल्याण विभाग मंत्रालय सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.लहू माळी व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबई यांना आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. बाबासाहेब बेलदार अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर विभाग यांना महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.मिन्नू पी.एम. सहायक जिल्हाधिकारी, भातकुली-तिवसा उपविभाग, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मानसी सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची महापालिका आयुक्त, लातूर महानगरपालिका, लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles