Sunday, December 14, 2025

बीडच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आ.क्षीरसागर अजितदादांकडे

तातडीने कार्यवाही करण्याचे प्रधान सचिवांना अजितदादांचे निर्देश

बीड — बीड शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. याचसंदर्भात मंगळवारी (दि.२८) रोजीही आ.संदीप क्षीरसागर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांची भेट घेतली. यावर अजितदादांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.


मुबलक प्रमाणाय पाणीसाठा उपलब्ध असून देखील बीड शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. पंधरा-पंधरा दिवसांतून एकदा पाणी बीड शहरवासीयांना मिळत आहे. याचे कारण म्हणजे सध्या जी पाणीपुरवठ्याची योजना कार्यरत आहे ती अपुरी पडत आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीनुसार पुरेशी असणारी अमृत अटल योजना काम पूर्ण होऊन उपलब्ध देखील आहे. परंतु बीड नगरपालिकेकडे ३६ कोटी रूपयांचे वीजबिल थकलेले असल्याने महावितरण विभाग या नवीन पाणीपुरवठा योजनेला वीज कनेक्शन देत नाही. परिणामी पाणी आणि योजना हे दोन्ही उपलब्ध असताना बीडकरांना पाण्यासाठी पंधरा-पंधरा दिवस वाट पहावी लागते. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केलेला आहे आणि तो आताही सुरूच आहे. आ.क्षीरसागर यांनी अनेक वेळा अधिवेशनात हा प्रश्न मांडला आहे. अनेकवेळा सरकारदरबारी मंत्री महोदयांकडे बैठका घेऊन हा प्रश्न लावण्यासाठी विनंती केली आहे. यासोबतच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडेही याबाबतच्या बैठका घेऊन यात मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शेवटी या विषयात आ.संदीप क्षीरसागर यांनी माजी आ.सय्यद सलीम यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल केली होती.
आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न विधिमंडळ, मंत्रालय, प्रशासन आणि न्यायालय अशा सर्वच स्तरावर मांडला आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. आताही‌ याच प्रश्नावर आ.संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांची भेट घेतली आहे. त्यावर ना.अजिदादांनीही लगेचच, बीड शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करा, असे निर्देश नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांना दिले आहेत. आता ना.अजित दादा पवार यांच्या माध्यमातून बीड शहराचा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेलच अशी अपेक्षा आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान याप्रसंगी ना.हसन मुश्रीफ साहेब तसेच वरिष्ठ स्तरावरील प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles