बीड — एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे पहिला नवरदेव लग्न लागल्यानंतर मंडपातून पळून जाताच दुसऱ्या सोबत विवाह लावल्याचा खळबळ जनक प्रकार बीड शहरातील शाहूनगर भागात उघडकीस आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील तेरा वर्षीय मुलगी नुकतीच पाचवी उत्तीर्ण झाली. मात्र तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईने तिचा विवाह लावण्याचे ठरवले. पहिला विवाह 32 वर्ष मुलासोबत ठरवण्यात आला. तो विवाह झाला. या 32 वर्षीय इसमाला दोन पत्नी आहेत. दोघीही सध्या नांदत नसल्याची माहिती मिळाली आहे. या लग्नाची माहिती त्याच्या पहिल्या पत्नीला मिळाली. येत असल्याचे पाहताच त्याने तिथून पळ काढला. या नंतर लागलीच दुसरा नवरदेव लग्नासाठी बोलविण्यात आला आणि त्याच्यासोबत या तेरा वर्षीय मुलीचा विवाह लावला गेला. याची माहिती प्रशासनाला मिळताच, पळून जात असताना पोलिसांनी रस्त्यावर अडवून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान बालविवाहाची माहिती मिळाली यावेळी पाेलिसांना सांगितले. पाचवीच्या वर्गातील मुलीचे दोन विवाह झाल्याचे समोर आले. परंतु, यात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य केले नाही. टोलवाटोलवी केली. अशाने बालविवाह कसे थांबतील असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी उपस्थित केला आहे.

