बीड — ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पीआय मारुती खेडकर बीड ग्रामीण ठाण्याचा कारभार पाहणार आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी आज आदेश जारी केले. आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.
उस्मान शेख यांची लातूरला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर एसबी च्या प्रमुख पदाची बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीआय शिवाजी बंटेवाड यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेची घडी व्यवस्थित बसवावी लागणार आहे. वाढती गुन्हेगारी रोखणं त्यांच्यापुढे आव्हान राहणार आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याची रिक्त झालेल्या जागेवर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे मारुती खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर किशोर पवार हे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचा कारभार पाहणार आहेत. शरद जोगदंड अंबाजोगाईला वर्षा शिंदे वडवणी, महादेव ढाकणे दिंद्रुड, मनोज निलंगेकर तलवाड्याला, प्रवीण जाधव शिरूर का., अमोल केदार एसपी रीडर तर आदिनाथ भडके अंभोरा पोलीस ठाण्याला बदलून गेले आहेत. पी आय विनोद घोळवे सायबर क्राईम ला एपीआय गणेश धोक्रट डीएसबी, राजेंद्र घुगे अंबाजोगाई शहर, संतोष जंजाळ पाटोदा, रत्नाकर गुळवे एटीबी, पीएसआय भारत बर्डे युसुफ वडगावला, शफिक सय्यद एस डी पी ओ रीडर बीड, आनंद शिंदे अंबाजोगाई शहर ला बदलून गेले आहेत. याबरोबरच आणखी फेर बदल पोलीस दलात होणार आहेत.

