राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परळी तहसिलदार मुंडे यांच्या माध्यमातून निवेदन सादर
बीड — उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे कार्यरत असलेल्या आरोग्य अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या झालेल्या दुर्दैवी व संशयास्पद मृत्यू प्रकरणी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ही मागणी परळी तहसिल कार्यालयाचे मा. तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, डॉ. संपदा मुंडे या एक जबाबदार, कर्तव्यनिष्ठ आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या आरोग्य अधिकारी होत्या. त्यांच्या मृत्यूमागील कारणांचा सखोल व निष्पक्ष तपास होऊन सत्यसमोर यावे आणि या प्रकरणात संबंधित दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देण्याच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांत मुंडे, प्रशासकीय अधिकारी शेख नर्सिंग सल्लागार ताई परळीकर, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य साद कामिल प्राध्यापक राम होळंबे तसेच संस्थेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केले की, “आरोग्य क्षेत्रात कार्यरत डॉक्टरांवर वाढता ताण, प्रशासकीय दबाव आणि सुरक्षा अभाव ही चिंताजनक बाब आहे. डॉ. मुंडे यांच्या मृत्यूच्या प्रकरणातून शासनाने गांभीर्याने धडा घेत डॉक्टरांसाठी सुरक्षित कार्य वातावरणाची हमी द्यावी.”
तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आली असून, या प्रकरणात त्वरित चौकशी सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे

