Sunday, February 1, 2026

पोलीस ठाण्याच्या आवारातच गोरक्षकाला बेदम मारहाण

बीड — कत्तलीसाठी गाई घेऊन जाणाऱ्यांना विरोध केल्याच्या कारणावरून गोरक्षकाला पोलीस ठाण्याच्या आवारातच बेदम मारहाण केल्याची घटना चकलांबा येथे घडली. मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी यासाठी गाव बंद ठेवून आंदोलन करण्यात आले.

चकलांबा येथील गोरक्षक गोपाल मधुकर उनवणे वय 24 वर्षे रा.चकलांबा यास दि. 27 जानेवारी रोजी रात्री 10 ते 15 समाजकंटकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे या तरुणाचा जीव वाचला. पोलीस आल्याचे पाहिल्यानंतर मारहाण करणारे तरुण तिथुन निघून गेले. गोपाळ उनवणे याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिहाण सय्यद, पिंटू सय्यद, अफसर चंदू शेख, असलम मेहबुब कादरी यांचसह 10 ते 15 जणांनी शिवीगाळ करत जबर मारहाण केली. रिहाण सय्यद याने खाली पडलेला दगड हातात धरुन डोक्यावर मारला. ओरडण्याचा आवाज ऐकुन लगेच पोलीस स्टेशन चकलांबा येथील पोलीस पळत आल्याने वरील लोक पोलीसांना पाहून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. उनवणे यांना डोळ्याजवळ मोठी जखम झाल्याने पोलिसांनी उपचारासाठी उनवणे यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.मारहाण करणाऱ्या वरील लोकांविरुध्द तक्रार दिली असून पुढील तपास चकलांबा पोलिस करत आहेत. गोरक्षकावर झालेल्या हल्ल्यामुळे चकलांबा गावात आरोपींना अटक करण्यात यावी यासाठी गावात कडकडीत पाळून पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles