Tuesday, April 29, 2025

पवनचक्क्या कंपन्यांची हुजरे गिरी करणाऱ्या अविनाशी पा”ठकां”ना महामानवाच्या संगीत रजनीचं वावड का? ✒️ भाग –2

बीड — समता न्याय बंधुत्व याची शिकवण देत देशाला संविधान देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कायदे एकीकडे जिल्हाधिकारी पदावर बसून अविनाश पाठक पवन ऊर्जा कंपन्यांना संरक्षण देत पायदळी तुडवत आहेत.शेतकऱ्यावर अत्याचार करत आहेत. तर दुसरीकडे महामानवाच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या संगीत रजनी कार्यक्रमाच्या परंपरेला परवानगी नाकारण्याचं काम केलं आहे. पवनचक्क्या कंपन्यांना संरक्षण द्यायला यांच्याकडे पोलीसांचा फौज फाटा आहे.पण शांततेने होणाऱ्या या कार्यक्रमा बाबतही अन्यायकारक दुटप्पी भूमिका जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी घेतल्याने खळबळ माजली आहे.
बीड जिल्ह्यात सध्या अविनाश पाठक यांना “वाटतो तोच कायदा”बाकी सब झूट अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी पदावर बसून न्यायाची भूमिका घेण अपेक्षित असताना पवन ऊर्जा कंपन्यांची चाटायची एवढीच भूमिका अविनाश पाठक सध्या घेत आहेत. परिणामी विकासाच्या नावाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार होतो आहे. कंपन्यांची दांडगाई, त्यांना मिळणारं पोलीस संरक्षण, अविनाश पाठक यांची धृतराष्ट्राची भूमिका यामुळे रझाकाराच्या जमान्यात जगतो आहोत असं शेतकऱ्यांना वाटू लागला आहे. कायदे पायदळी तुडवत जिल्हाधिकारी कारभार हाकत शेतकऱ्यांचं जीन हराम करत आहेत. पवनचक्क्या कंपन्यांना संरक्षण देण्यासाठी पोलिसांचा मुबलक फौज फाटा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. पोलीस बळाच्या जीवावरच शेतकऱ्यावर त्राही माम् म्हणण्याची वेळ पाठक यांनी आणली आहे. सगळी लाज लज्जा शरम हया त्यांनी कंपन्यांच्या पायाशी वाहिली आहे. माध्यम या विरोधात आवाज उठवत असली तरी कुठलही सोयर सुतक पाळायला अविनाश पाठक तयार नाहीत. पवनचक्की सौर ऊर्जा कंपनी यांना संरक्षण द्यायला यांच्याकडे पोलीस यंत्रणा आहे. पण त्याचवेळी महामानवाच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित भीम गीतांचा संगीत रजनी कार्यक्रमाच यांना वावड व्हावं हे संविधान देणाऱ्या महामानवाचे दुर्दैव नाही काय? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने जयंतीच्या पूर्वसंध्येला बीडच्या बाजार तळावर संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दरवर्षीच्या परंपरेनुसार यावर्षी देखील कार्यक्रमासाठी परवानगी मागण्यात आली. या संगीत रजनी कार्यक्रमाला ग्रामीण भागातील आंबेडकरी जनता मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावते. रात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेली समता ज्योत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर पोहोचते. या ठिकाणी महामानवाला अभिवादन करून आंबेडकरी जनता आप आपल्या घरी जाते. या परंपरेला यावर्षी मात्र फाटा बसणार आहे. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षकांच्या हरकतीचा मुद्दा पुढे केला आहे. या ठिकाणी बाजार भरतो त्यामुळे परिसरातून गर्दी वाढू शकते त्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत लाऊड स्पीकर ला परवानगी देण्यास पोलीस अधीक्षकांनी हरकत घेतली आहे. सायंकाळी सातच्या सुमारास बाजार संपतो. त्यानंतर बाजार तळाचे मैदान रिकामे राहणार आहे. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांना मात्र लक्षात आली नाही का? विशेष महत्त्वाची बाब म्हणजे रामनवमीच्या दिवशी बीडचा बाजार नगरपालिकेने बंद ठेवला होता. त्याच पद्धतीने यावेळी देखील बाजार बंद ठेवता आला असता. पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग इच्छाच नसेल तर शेवटी करणार काय? आले पाठकांच्या मना तेथे कोणाचे चालेना असं म्हणण्याची वेळ आली आहे.आजपर्यंत संगीत रजनी कार्यक्रम शांततेत पार पडला. कधीही आंबेडकरी जनतेने गालबोट लागू दिले नाही. असं असताना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी परवानगी नाकारणे अन्याय करणारे असल्याची भावना जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अशा मनमानी कारभाराला आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles