नेकनूर — जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन अकरा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची नात्याला काळीमा फासणारी खळबळ जनक घटना घडली आहे. ही घटना नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात शुक्रवारी घडली
नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या एका गावातील दाम्पत्यामध्ये घरगुती कारणावरून वाद निर्माण झाले होते. या वादातून आरोपीची पत्नी पुण्याला निघून गेली होती. तर मुलगी एकटी घरी होती. शुक्रवारी रात्री राहत्या घरातच नराधम पित्याने पोटाच्या मुलीवर अत्याचार केला. सदरील प्रकार हा मुलीची आई पुण्यावरून आल्यानंतर समोर आला. पिडीतेच्या आईने याबाबत आज नेकनूर पोलीस ठाण्यात जावून नराधम पित्या विरोधात तक्रार दाखल केली त्यानुसार आरोपीविरोधात बाल लैगिंक अत्याचार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या नराधाम आरोपी नेकनूर पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेमुळे नेकनूर परिसरात खळबळ उडाली.