बीड — उमाकिरण लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी विजय पवार याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच बाललैंगिक अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पालक व विद्यार्थ्यांनी पुढे येऊन गुन्हा नोंद करावा असे आवाहन केले होते. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी शिक्षक विजय पवार व प्रशांत खटोकर या दोघांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी शनिवारी भेट घेत पीडितेची व पालकांशी चर्चा केली. 2023 मध्ये विजय पवार विरोधात जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे बाललैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. मात्र या प्रकरणात काहीच कारवाई झाली नव्हती. या प्रकरणात चौकशी करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना चाकणकर यांनी दिल्या होत्या. दरम्यान विजय पवार विरोधात बाललैंगिक अत्याचार (पाॅक्सो अॅक्ट) तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच पवारच्या संस्थेत शिक्षण घेत असलेल्या मुलीच्या पालकांनी पुढे येत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

