बीड — केज मतदार संघाचा सर्वांगीण विकास करताना धार्मिक श्रद्धास्थानांच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आ.नमिता मुंदडा यांनी आणला. त्यामुळे भाविकांमध्ये समाधान तर व्यक्त केले गेलेच शिवाय संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी याचा फायदा होणार आहे. एकंदरच विकासाची गंगोत्री वाहती ठेवल्याने ही निवडणूक नमिता मुंदडा यांच्यासाठी औपचारिकता बनली आहे.
राजकारणा सोबतच मतदारसंघाचा सर्वार्थाने परिपूर्ण विकास करायचा तर धार्मिक श्रद्धा स्थानांचा देखील विचार केला तरच पायाभूत विकासाला चालना मिळते. नेमकं पायाभूत विकासाचीच कास नमिता मुंदडा यांनी आपल्या कार्यकाळात धरली. धार्मिक परंपरेला देखील महत्त्व देत अकरा कोटी रुपयांच्या निधीतून विविध ठिकाणच्या मंदिरांचा विकास करण शक्य झालं. जनतेसाठी वीज, पाणी, रस्ते यासारख्या मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देतानाच धार्मिक महत्त्व वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहिल्याने नमिता मुंदडा यांनी विकासाची नवी ओळख जनतेला करून दिली. मतदारसंघातील देवस्थान विकासासाठी पर्यटन विकास व तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत निधी आणला. यामध्ये बालाघाटाचं आराध्य दैवत व वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या नेकनुर येथील बंकट स्वामी संस्थान मंदिरासाठी 70 लाख रुपयांचा किर्तन मंडप, विड्यातील शिवरामपुरी मठ संस्थानासाठी 50 लाखाचा सभामंडप याबरोबरच वरपगाव येथील शिवराम मंदिर मठ संस्थान साठी एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी सभामंडपासाठी मिळवून दिला. आडस परिसरातील आराध्य दैवत आडकेश्वर महादेव मंदिरासाठी 25 लक्ष, हनुमान मंदिरासाठी 25 लक्ष, आवसगाव येथील श्रीराम मंदिरासाठी 50 लक्ष, युसुफ वडगाव येथील श्रीराम मंदिरासाठी 50 लक्ष रुपये, वाघे बाबुळगाव येथील वाघेश्वरी देवी मंदिरासाठी 50 लक्ष रुपये रामेश्वर वाडी (हंगेवाडी) मधील महादेव मंदिरासाठी 25 लक्ष रुपये, सासुराई येथील एकनाथ महाराज समाधी मंदिरासाठी 25 लक्ष रुपयांचा निधी देखील मिळवून दिला. एवढ्यावरच हे काम थांबलं नाही तर नांदूर घाटी येथील तळ्याच्या आई देवस्थान साठी 40 लक्ष रुपये, मौलाली पहाड येथे 50 लक्ष, देवळातील देवीच्या मंदिरासाठी 50 लक्ष रुपये, सनई येथील कोपर नाथ मंदिर पन्नास लक्ष, मा के गावच्या दत्त मंदिरासाठी 50 लक्ष, सोमनाथ महादेव मंदिर बोरगाव येथे 25 लक्ष, नामदेव महाराज मंदिर चिंचोली माळी येथे पन्नास लक्ष, धनेगाव मधील मोसाई देवी मंदिरासाठी 50 लक्ष, केज शहरातील भवानी आई मंदिरासाठी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात यश मिळवलं.
एवढेच नाही तर मुस्लिम व हिंदू श्रद्धास्थान असलेल्या हजरत ख्वाजा महजबोद्दीन दर्गाह साठी 25 लक्ष रुपये, कुंबेफळ येथील सिद्धिविनायक मंदिरासाठी दोन कोटी रुपये याबरोबरच वडमाऊली येथील देवस्थानासाठी दोन कोटी रुपयांचा निधी आपल्या कार्यकाळात मंजूर केला. या निधीमधून अनेक देवस्थान ठिकाणी सभामंडप किचन शेड पालखी हॉल पेव्हर ब्लॉक सुशोभीकरणासारखी काम करण्यात आली किंवा ती सद्यस्थितीत सुरू आहेत.
यामुळे केज मतदार संघ आ.नमिता मुंदडा यांच्यासारखा विकासाची दृष्टी असणार नेतृत्व मिळाल्यामुळे विकास गंगा या मतदारसंघातून वाहण्यास सुरुवात झाली आहे. एकंदरच नमिता मुंदडा यांच्यासाठी केलेली विकास कामच त्यांच्या कर्तुत्वाची साक्ष देत असून कामाच्या माध्यमातून आपोआप प्रचार होऊ लागला आहे. मतदार संघात त्यामुळे नमिता मुंदडा यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी बनत चालली आहे. विकास त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारे ठरत आहे.

