
बीड — सक्तीने कैद्यांचे धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपावरून वादग्रस्त ठरलेले कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड विरोधात राज्यात वादळ उठले आहे. याचं प्रकरणामुळे त्यांची उचल बांगडी करण्यात आली आहे.
बीड कारागृह सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारागृहात असलेल्या वाल्मीक कराड प्रकरणावरून अनेक वेळा बीड कारागृह या ना त्याकारणाने नेहमी चर्चेत राहिले आहे. पेट्रस गायकवाड कारागृह अधीक्षक बनल्यानंतर मात्र कारागृहात महापुरुषांचे फोटो काढून टाकण्यात आले. भजन कीर्तन बंद करण्यात आले. याबरोबरच कारागृहातील भिंतीवर बायबलचे श्लोक लिहिण्याचं कामही त्यांनी करून घेतलं. कारागृहातील कैद्यांना स्वतःची घरची कामे देखील करण्यास भाग पाडले जात होते. या संदर्भात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आवाज उठवला होता. आरोपांचं वादळ उठल्यानंतर राज्यात खळबळ माजली. अखेर पेट्रस गायकवाड यांच्या या कारनाम्यामुळे अखेर बदली करण्यात आली. नागपूर येथे उपाधिक्षक म्हणून त्यांना पाठविण्यात आले आहे.

