बीड — शहरातील जनतेला महिनाभरापासून नळाला पाणी आलेले नाही. सध्या पाणीबाणी सुरू आहे .114 कोटी रुपयांची अमृत अटल योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी आणि मे.प्रगती कन्स्ट्रक्शन लातुर यांनी 2 वर्षं कालमर्यादा असतानाही 7 वर्षे उलटूनही अद्याप रखडलेल्या अवस्थेत असल्याने कारवाई करण्यात यावी तसेच पाणीपुरवठ्यासाठी महावितरणच्या 33 कोटी रूपये थकबाकी साठी जिल्हा नियोजन समिती अथवा राज्याच्या वित्त विभागातुन तरतूद करण्यात यावी. बीडकरांची तहान आणि घशाची कोरड हे लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ठेकेदार जल योजनेचे मारेकरी आहेत. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांनी बीडकरांना वा-यावर सोडले असुन पाण्याअभावी बीडकरांचे हाल होत असुन केवळ बीडच्या पाणीपुरवठ्यासाठी बैठकांचा फार्स होत असुन यांच्या निषेधार्थ
आणि बीड शहराला नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा या प्रमुख मागणीकडे लक्ष्य वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.5 सोमवार रोजी बीड शहरातील राजीव गांधी चौक परीसरातील नारायणी इंग्लिश स्कूल समोरील व्हाल्ववर ” पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला अभ्यंगस्नान ” लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आंदोलनात शेख युनुस,सुदाम तांदळे, शेख मुबीन,शेख मुस्ताक, रामनाथ खोड आणि आप जिल्हाध्यक्ष अशोक येडे सहभागी होते.
शहरी भागात प्रतिमानसी प्रतिदिन 135 लिटर पाणी मिळावे असा दंडक आहे.परंतु बीडकरांना महिन्यांपासून नळाला पाणी नाही.रखरखत्या ऊन्हात सुर्य आग ओकत असताना बीडकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.शहरासाठी बिंदुसरा धरणातुन एक, माजलगाव धरणावरून “माजलगाव बॅक वाटर आणि अमृत अटल अशा 3 योजना आहेत.परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांचे दुर्लक्ष असुन नगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि काम करणाऱ्या मे प्रगती कन्स्ट्रक्शन या ठेकेदार यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे पाणी योजनेचा बोजवारा उडाला असुन ऐन भर उन्हाळ्यात दुरूस्तीच्या कामामुळे अनेक भागात महिनाभरापासून नळाला पाणी नसल्याने पाणीबाणी सुरू आहे बीड शहरासाठी 114 कोटी रुपयांची अमृत अटल योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मे.प्रगती कन्स्ट्रक्शन लातुर यांच्या हलगर्जीपणामुळे 2वर्षें कालमर्यादा असताना अद्याप 7 वर्षे उलटूनही रखडलेल्या अवस्थेत आहे.त्यामुळे बीडकरांना तिव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागत असुन संबंधितांवर कठोर कारवाई करून काम पूर्ण करण्यात यावे.तसेच बीड शहराला नियमित पाणीपुरवठ्यासाठी महावितरणच्या 33 कोटी रुपये थकबाकीसाठी जिल्हा नियोजन समिती अथवा राज्याच्या वित्त विभागातुन तरतूद करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली.

