बीड — नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना “धनंजय मुंडे समर्थक” या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट खोलून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची बदनामी करणाऱ्या पोस्ट व्हायरल करण्यात आल्याची चर्चा आहे.धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून याबाबत दखल घेण्यात आली आहे. संबंधित फेक अकाउंट विरोधात धनंजय मुंडे यांच्या वतीने अक्षय तिडके यांच्यामार्फत बीड सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
धनंजय मुंडेंचे समर्थक असल्याचे सांगून अजितदादांच्या बदनामीकारक पोस्ट करणे आक्षेपार्ह आहे. यामुळे अनेकदा संभ्रम निर्माण करणारी परिस्थिती केली जात आहे. या एकूण तक्रारीची दखल घेत तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशा सूचना सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश केळे यांनी दिल्या. तसेच धनंजय मुंडे यांच्या वतीने कारवाई केली जात असल्याची माहिती समोर आली. तर सदर प्रकरणात तातडीने माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक निलेश केळे यांनी सांगितले आहे.

