Sunday, December 14, 2025

देवेंद्र फडणवीसांनी बेईमानी केल्याचा आरोप, मनोज जरांगे पाटील उपोषण स्थगित करणार!

जालना — आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी 25 जानेवारीपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली असून सकाळी त्यांना सलाईन लावण्यात आली. जरांगे पाटील यांनी

उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा मारेकरी कोण हे आता समोर आलं आहे, मराठा समाजाचं डोळे उघडले असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकाही केली.
तसेच यापुढे शक्यतो आरक्षणाची लढाई बंद करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. उपोषणकर्त्यांशी चर्चा करून यासंबंधित पुढील निर्णय घेण्यात येईल असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं.

मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले होते. गेल्या पाच दिवसांपासून हे उपोषण सुरू असून या दरम्यान जरांगे यांची तब्येत खालावली. तरीही शासन स्तरावरून या उपोषणाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं दिसून आलं. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एवढे दिवस आंदोलन करावं लागेल असं वाटलं नव्हतं असं मनोज जरांगे म्हणाले.
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी मंगळवारी रात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण तापलं असतानाच दुसरीकडे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू होतं. त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष हटू नये
यासाठी उपोषण मागे घेत असल्याचं जरागे यांनी स्पष्ट केलं.
मनोज जरांगे म्हणाले की, “खरं आहे ते टिकत नाही, जे हक्काचं आहे तेच देत नाहीत. फडणवीस मराठा आरक्षणावर होय पण म्हणत नाहीत आणि नाहीपण म्हणत नाहीत. ते गप्प बसलेत त्यांच्या मनातली सूड भावना समोर आली आहे.
आमच्यासोबत बेइमानी केली तर पाच वर्षे सरकार नीट चालू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला होता. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करणार की नाही हे सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांना त्यांनी अल्टिमेटमही दिला होता. पण आता आंदोलन थांबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles