दारू, कला केंद्राच्या नादात एका तरुणाचा बळी

केज — साळेगाव येथील एक औषध विक्रेता तरुण मित्रांसोबत धाराशिव जिल्ह्यातील एका कला केंद्रावर गेले. कला केंद्रावर जाण्यापूर्वी रस्त्यात सगळ्यांनी दारू पार्टी केली. कला केंद्रावर मौज मस्ती केली मात्र परत येत असताना मध्यरात्री त्याच्या छातीत आणि पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्याचा जीव गेला. त्याचे प्रेत त्याच गाडीतून घरी आणून टाकल्याची घटना घडली.दरम्यान बार्शी येथील नर्तिका पूजा गायकवाडच्या प्रेमात अडकलेल्या गेवराईच्या लुखामसला येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली होती. त्या नंतर सतीश मुंडे यांच्या हत्ये नंतर पुन्हा धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्र चर्चेत आले आहे.
याबाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील साळेगाव येथील महाराष्ट्र मेडिकलचे औषध विक्रेते सतीश भागवतराव मुंडे वय 37 वर्ष) हे दि. 12 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मित्रा सोबत धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथे महाकाली कला केंद्रावर नर्तिकींचे नाच-गाणे पाहण्यासाठी शेख अजमोद्दीन ऊर्फ मुन्ना शेख जिलानी यांच्या स्विफ्ट डिझायर कार मधून गेले होते. कला केंद्रावर जात असताना त्यांनी साळेगाव येथील बारमध्ये दारू पिले. नंतर कळंब आणि येरमाळा येथील एका धाब्यावर दारू पिले. त्यानंतर रात्री 12.15 वाजे पर्यंत ते कला केंद्रात होते. त्या नंतर दि. 13 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ते गावाकडे परत येत असताना दुसऱ्या एका गाडीतील त्यांच्या ओळखीच्या तरुणांनी गाडी रस्त्यात थांबवून जुन्या भांडणाची कुरापत काढत संगनमत करून सतीश मुंडे यास छातीत व पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यातच सतीश मुंडे यांचा मृत्यू झाला.
सतीश मुंडे याचा मृत्यू झाल्यानंतर स्विफ्ट चालक शेख अजमोद्दीन ऊर्फ मुन्ना शेख जिलानी याने रात्री 1 वाजण्याच्या सुमारास सतीश मुंडे याला त्याच कारमधून साळेगाव येथे त्याच्या घरी घेऊन आला. घरी आल्यानंतर सतीश मुंडे यांच्या आई वडीलांना त्याने सांगितले की, सतीश मुंडे हा खूप दारू पिलेला असल्याने तो बेशुद्ध पडला आहे. सतीश मुंडे यांच्या वडिलांनी सतीश यास आवाज दिला असता त्याने काही हालचाल केली नाही किंवा प्रतिसाद दिला नाही. भाऊ आणि पुतण्या यांच्या मदतीने सतीश याला केज येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. परंतु तेथील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्यांना अंबाजोगाई येथे जाण्याचा सल्ला दिला. अंबाजोगाई येथे सतीश मुंडे याला घेऊन गेल्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतीश मुंडे मयत झाल्याचे घोषित केले.त्यानंतर मयत सतीश मुंडे यांचे वडील भागवत बळीराम मुंडे यांनी दि. 15 फेब्रुवारी रोजी येरमाळा जि. धाराशिव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून शेख अजमोद्दीन ऊर्फ मुन्ना शेख जिलानी, शेख शकील रौफ, संजय जनार्दन गित्ते आणि दत्ता बाबासाहेब तोंडे सर्व रा. साळेगाव ता. केज जि. बीड यांच्या विरुद्ध गु र नं 38/2026 भा न्या सं 103,191(2) 115(2) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरमाळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्या भालू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील भोजगुडे हे तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles