बीड — बीडचा फरार गुटखा माफिया जेरबंद केल्यानंतर सपोनी बाळराजे दराडे यांनी बीडच्या जुन्या आरटीओ ऑफिस जवळ गुटख्याने भरलेला कंटेनर लातूरकडे जात असताना पकडला. या कंटेनरवर केलेल्या कारवाईत एक कोटीहून अधिक किमतीचा राज निवास गुटखा पकडला गेला आहे

ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांनी अवैध धंद्यावर कारवाया करून जिल्ह्याचे लक्ष आपल्याकडे केंद्रित केले आहे. 16 ऑक्टोबर रोजी गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेला गुटखा माफिया महारुद्र मुळे यास पकडण्यात यश मिळवले. त्यानंतरही त्यांचा कारवायाचा धडाका सुरूच आहे.
बुधवारी रात्री 8 च्या सुमारास त्यांनी जुन्या आरटीओ कार्यालया जवळ सापळा रचून गुटख्याने भरलेल्या पूर्ण कंटेनर ताब्यात घेतला आहे. यात राजनिवास हा गुटखा असून तो छत्रपती संभाजी नगरहून लातूरकडे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. सपोनि बाळराजे दराडे यांनी केलेल्या या कारवाईमुळे गुटखा माफियांचे मात्र धाबे दणाणले आहेत. दराडे यांनी केलेले या कारवाईत एक कोटीहून अधिक च्या किमतीचा गुटखा असल्याची माहिती दिली जात आहे. सध्या हा कंटेनर पोलीस मुख्यालयात घेऊन जाण्यात आला आहे.

