बीड — चौसाळा परिसरात टी ई क्यू ग्रीन पावर कंपनी टॉवर लाईन वरून तार ओढण्याचं काम करत आहे. यावेळी मावेजा मिळावा यासाठी जमलेल्या शेतकऱ्यांना कंपनीच्या गाडे नावाच्या कर्मचाऱ्याने जिल्हाधिकाऱ्याकडे जा काय वाकडं करायचं ते करा आशा संतप्त भाषेत उत्तर देऊन जिल्हाधिकारी दावणीला बांधला असल्याचं सांगितलं. या प्रकाराने मात्र शेतकरी हक्का बक्का झाले असून गाडेच्या या मग्रूर भाषेने पा”ठका“चे पितळ उघडे पडले असून सह्याद्री “माझा“ने आजपर्यंत शेतकऱ्यांच्या व्यथांवर, अविनाशी सत्यानाशी वृत्तीने शेतकरी ठकवला जातो आहे याला पुष्टी मिळाली आहे.

चौसाळा जवळील हिंगणी बु. येथे टी इ क्यू कंपनीने टॉवर उभारणी करून वीजवहन करण्यासाठी तारा ओढण्याच काम पूर्ण केलं. यामध्ये बाधित झालेल्या जवळपास वीस बावीस शेतकऱ्यांना सुरुवातीला पीक नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम कंपनीने दिली होती. मात्र बाधित क्षेत्राचा मावेजा 3 हजार रुपये मीटरने तसेच ज्या शेतामध्ये टॉवर उभारणी केली आहे. त्यांना प्रति टॉवर पाच लाख रुपये देण्याचे कंपनीने कबूल केले. हेच पैसे मिळावेत यासाठी धुळे सोलापूर महामार्गावर चौसाळाजवळ कंपनीचे काम सुरू असताना शेतकऱ्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे तेथे भेट घेतली. बऱ्याचश्या शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण केलं. मावेजा ही दिला. मात्र दोन शेतकऱ्यांना 15 – 15 वर्षापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आंबा, चिंच यासारख्या फळझाडांचा मावेजा सरकारी निकषाप्रमाणे मिळावा अशी मागणी सुरुवातीपासून करण्यात येत होती. प्रत्येक वेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला गोड बोलून पान पुसली. मात्र आज कंपनी कर्मचाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला. तो नुसता समोर आला नाही तर जिल्हाधिकारी अविनाश पाठक कंपनीच्या खिशात खेडवळ भाषेत सांगायचं तर कसे दावणीला बांधल्या गेले आहेत हे सत्य उघडकीस आलं. गाडे नावाच्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने रागाच्या भरात का होईना पा”ठका“ची पोल खोलली. उरली सुरली सुद्धा इज्जत धुळी ला मिळाली
गाडे नावाच्या कर्मचाऱ्याने मग्रूरीत शेतकऱ्यांना काय करायचं ते करा? जिल्हाधिकारी आमचं काहीच करू शकत नाहीत असे शब्द वापरल्यामुळे उपस्थित शेतकरी हक्का बक्का झाले. पाठक साहेबांनी इतक्या मोठ्या पदावर बसलेले असताना एवढी छी थू करून घ्यायला नको होती. आशा भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. काहींनी तर पट्टी गोळा केली असती तर कोट्यावधी रुपये पाठक साहेबांना देता आले असते. पण कंपनीची भाड खायची गरज काय होती? आशा भावना देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

