घरकुल हप्त्यासाठी बेबाकी प्रमाणपत्रासाठी लाच घेणारा ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

केज – पंतप्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणारे बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवकाने लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून शुक्रवारी दि. 20 सप्टेंबर दुपारी केकतसारणीच्या  ग्राम सेवकाला पकडले.या प्रकरणी केकतसारणी येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील केकतसारणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात  ग्रामसेवक या पदावर गंगाधर सुरेश ठोंबरे वय-४४ वर्ष रा. सारणी (सांगवी), हल्ली मुक्काम भगवानबाबा चौक, एम.आय.टी. रोड, अंबाजोगाई हे येथे सेवेत कार्यरत आहेत.

त्यांनी घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणाऱ्या बेबाकी प्रमाणपत्राच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारदार लाच देण्यास इच्छुक नसल्याने अठरा सप्टेंबर रोजी बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांच्याकडे त्यांनी लेखी तक्रार दाखल केली.

प्राथमिक पडताळणीत ग्रामपंचायत अधिकारी ठोंबरे यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीनंतर त्यांनी चार हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून दोन हजार रुपये देण्याचे ठरले. या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अठरा सप्टेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली.

त्यानंतर एक्कोणीस सप्टेंबर रोजी केज पंचायत समिती कार्यालय परिसरात तक्रारदाराकडून पंचासमक्ष दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक गंगाधर ठोंबरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक आनंद कडू यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे.

त्यानंतर ग्रामसेवक गंगाधर ठोंबरे यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड येथील पथकाने केलेल्या कारवाईने ग्रामसेवकाचा गैरप्रकार उघड आहे. या कारवाईने तालुक्यातील इतर लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles