बीड — स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून तब्बल एक कोटी 37 लाख रुपयाचा 490 किलो गांजा शेतातून जप्त केला. ही कारवाई चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील धुमेगाव शिवारात करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे सुरू असले तरी त्याकडे ठाणे प्रमुखांकडून दुर्लक्ष होत आहे.परिणामी पोलिसांच्या नाकावर टिच्चून गांजा पिकवून त्याची सर्रास तस्करी केली जात असली तरी हप्ते खोरी पुढे कायदे धाब्यावर बसवण्याचं काम राजरोस सुरू आहे. दरम्यान
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्हयातील सर्वच प्रकारचे अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड. यांना आदेश दिलेले आहे. त्या अनुषंगाने दि. 1नोव्हें. रोजी पोनि. शिवाजी बंटेवाड यांना गोपनिय माहिती मिळाली की, मौजे धुमेगाव शिवारातील पिराचे शेतात नारायण मगर याने त्याचे आर्थीक फायद्यासाठी बेकादेशीररित्या अंमली पदार्थ गांजाच्या झाडाची लागवड केलेली आहे. त्यावरून ही माहिती पोलीस अधीक्षक, बीड व उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई यांना कळवुन त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पो.नि. शिवाजी बंटेवाड व प्रभारी अधिकारी पो.स्टे. चकलांबा यांचे संयुक्त पथक मौजे धुमेगाव शिवारातील पिराचे शेताजवळ गांजाची लागवड केलेल्या नारायण मगर यांचे शेतामध्ये छापा टाकला असता कापसाच्या पिकाच्या शेतामध्ये काही ठराविक ज्ञअंतरावर गांजाच्या झाडाची लागवड केल्याचे दिसुन आले. शेत मालक नारायण शेषेराव मगर वय 44 वर्षे व्य. शेती, रा. धुमेगाव ता. गेवराई यांना विचारपुस केली असता त्याने सदर गांजाचे झाडे लागवड केल्याचे सांगितले. तसेच सदर शेताचे शेजारी असलेल्या परिसराची पाहणी केली असता तेथे आरोपी सुरेश सर्जेराव मगर याच्या शेतात देखील गांजाची झाडे मिळून आली. त्यावरुन सदर दोन्ही शेतातील सर्व गांजाच्या झांडाचा सविस्तर पंचनामा करुन आरोपी नारायण शेषेराव मगर याचे गट क्र. 109 मध्ये 44 गांजाची झाडे वजन 153.15 ग्राम याचे अंदाज किंमत 42 लाख 88 हजार 200 रू. व आरोपी नामे सुरेश सर्जेराव मगर याचे मालकीचे शेतामध्ये 131 गांजाची झाडे वजन 337.55. ग्राम कि.अं. 94लाख 51 हजार 400 असा एकुण 490.70 किलो ग्राम वजनाचा गांजा 1 कोटी 37 लाख39 हजार 600 रु अंमली पदार्थ गांजाचा मुद्देमाल मिळुन आला. आरोपी नारायण शेषेराव मगर रा. धुमेगाव ता. गेवराई याला ताब्यात घेण्यात आले असून दोन आरोपी विरुध्द पो.स्टे. चकलांबा गुरनं 376/2025 कलम 8 (ब), 20 (ब), 20 (ब) (1), 20 (ब) (2) गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये आज गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक शिवाजी बंटेवाड (स्थागुशा), सपोनि गडवे, स्थागुशा पथकातील गोविंद राख, अंकुश वरपे, विकास राठोड, युनूस बागवान, सुनिल राठोड तसेच चकलांबा पो.स्टे.चे पोना कैलास गुजर व अंमलदार व महसुल विभागाचे चकलंबा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मिळुन केली आहे.

