Sunday, February 1, 2026

केज कळंब रस्त्यावर पेटलेल्या बसने अखेर बळी घेतलाच

मोटार सायकल अपघातात एक ठार

केज — केज – कळंब महामार्गावर प्रवाशांना घेऊन जाणारी बस दुपारी अचानक पेटली. ही जळालेली बस रस्त्यावर उभी असलेली अचानक दिसल्यामुळे मोटार सायकल स्वाराचा ताबा सुटला यात मोटार सायकल वरून जाणारे दोघे रस्त्यावर पडले. त्याचवेळी ट्रकने या दोघांना फरपटत नेले यात एक जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुपारी साडेतीन च्या सुमारास केस हून कळंब कडे जाणारी बस क्र.एम एच 11/ बी एल 9374 ने अचानक पेट घेतला. यातील 22 प्रवासी सुखरूप बाहेर पडू शकले. ही पेटलेली बस विझवल्या नंतर रस्त्याच्या कडेला तशीच राहिली. परिणामी रात्री आठच्या सुमारास माळेवाडी (ता.केज)येथील गणेश कल्याण हाके व अशोक बबन हाके मोटार सायकल क्र.एम एच 44) ए बी- 6234 ने प्रवास करत होते. अचानक समोर उभी असलेली जळालेली बस दिसल्याने मोटार सायकल स्वाराचा ताबा सुटला गेला. मोटर सायकलसह दोघेही रस्त्यावर पडले. त्याचवेळी कळंब कडून केजकडे जात असलेल्या ट्रकने एम एच- 10 /एस- 7916 मोटार सायकल सह दोघांना शंभर ते दीडशे फुट फरपटत नेले. यामध्ये गणेश हाके तसेच अशोक हाके हे दोघेही गंभीर जखमी झाले.या दोघांना तातडीने केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र अशोक बबन हाके याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles