बीड — बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत इव्हेंटच्या स्टंटबाजीने प्रसिद्धीच्या झोतात रहात असले तरी त्यांच्या इभ्रतीला “राख “फासण्याचं काम एपीआय चंद्रकांत गोसावी कडून होऊ लागल्याचं पाहायला मिळत आहे. गोविंद राख नावाच्या कर्मचाऱ्याची बदली झाली. तात्काळ पदभार सोडण्याचे आदेश दिले. पण तो प्रामाणिकपणे अवैध धंद्यातून मिळणाऱ्या कमाईची वसुली करून देणारा असल्याने एसपींचीच दिशाभूल करून बदली रोखण्यात यश मिळवल्याची माहिती मिळत आहे.
“गोविंद राख” माणूस तसा प्रामाणिक …!वसुलीची जबाबदारी गोसावींनी सोपवली ती अगदी प्रामाणिकपणे “नशा युक्त अभियानाला” प्राधान्य देत कमाई करून देणारा…! वाळू उपशातून होणारी कमाई असो की अवैध धंद्यातून असो की गौण खनिजातून प्रत्येक वेळी वर कमाईच्या आकडेवारीची कमान उंचावलेलीच ठेवली. त्यामुळे तो गोसावीं चा “खास माणूस” या प्रकारामध्ये मोडला जातो. गोविंद राख यांची बदली तीन साडेतीन महिन्यापूर्वी पिंपळनेर पोलीस ठाण्यात झाली. 15-20 दिवसाचा कालावधी उलटत नाही तोच नेकनूर पोलीस ठाण्यातील वसुलीचा चांगला अनुभव असल्याच्या कारणावरून बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ बदली झाली. बाकी वसुली सोडली तर पोलीस यंत्रणेच्या कर्तव्याची कुठलीच मोठी कामगिरी हातातून न पार पडलेलं व्यक्तिमत्व…! बदली करताना पोलीस अधीक्षकांनी तात्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे असे आदेश दिले. पण एस पी चे आदेश मानतील ते चंद्रकांत गोसावी कसले? गोसावींनी राखची बदली होताच इमोशनल करण्याचा डाव खेळला नेमके त्या डावालाच एस पी भुलले. त्याचवेळी नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत पवनचक्की रखवालदाराने गोळीबार केला त्यामध्ये एक चोरटा मारला गेला. या संधीचं सोन गोसावींनी केलं. कायदा सुव्यवस्थेच, मनुष्यबळाचं कारण पुढे केलं. पोलीस अधीक्षकांना फोन लावून चार-पाच दिवस गोविंद राख यांना नेकनूर पोलीस ठाण्यात कार्यरत राहू द्या अशी विनंती केली. यंत्रणेतील अधिकाऱ्यांवर असलेला विश्वास एसपींना नडला. याचाच गैरफायदा घेतला गेला. तीन साडेतीन महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील गोविंद राख अजूनही नेकनूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तो असेना का? अडचण काहीच नाही. पण कर्तव्य सोडून वसुलीच्या कामात प्रामाणिकपणा दाखवत अवैध धंद्यांना खतपाणी घालण्याची कृती मात्र सर्वसामान्य जनतेच्या मुळावर उठू लागली आहे. जिथे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत सारख्या कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकाऱ्याचा आदेश डावलला जात असेल ? त्यांनाच दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला जात असेल? अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिले जात असेल? त्यातून होणाऱ्या कमाईवर लक्ष ठेवले जात असेल? तर कावत यांच्या इभ्रतीला (साख) राख फासण्याच काम केलं जात असल्यामुळे सर्वसामान्य जनतेतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

