Sunday, December 14, 2025

कांवत यांचा दणका: गंजीटा सुरक्षारक्षक व वाळू माफियाला मदत करणारा शिपाई बडतर्फ

बीड — पोलीस अधीक्षकांच्या घरात गांजा ओढत बसलेल्या बाळू गहिनीनाथ बहिरवाळ तसेच वाळू माफियाला पळून जाण्यास मदत करणारा रामप्रसाद शिवनाथ कडूळे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी ही कारवाई केली.
बाळू गहिनीनाथ बहिरवाळ हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या निवासस्थानी सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त करण्यात आला होता. तो एका खोलीत गांजा ओढत बसलेला असताना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास पकडला गेला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बहिरवाळ विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच रामप्रसाद कडूळे हा कर्मचारी पिंपळनेर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला पकडले होते. याप्रकरणी त्याला निलंबित करण्यात आले होते. निलंबन कालावधी संपल्यानंतर पोलीस मुख्यालयात कडूळेस नेमणूक दिली. या काळात पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील वाळू चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी गोरख काळेच्या संपर्कात राहून त्यास पोलिसांच्या गोपनीय हालचालींची माहिती पुरवली. त्याला पळून लावण्यात सहकार्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. त्यास कलम 49 ,303 (2),3(5) अन्वये कलम 130 /177, 39/192 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक देखील करण्यात आली होती सध्या तो पोलीस कोठडीत आहे. रामप्रसाद कडूळे यांचे वर्तन गुन्हेगारी स्वरूपाचे असून पोलीस खात्यास न शोभणारे आहेत. पोलीस दलाची प्रतिमा त्याच्यामुळे मलीन झाली असल्याने पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे. पोलीस हे कायद्याचा रक्षक आहेत त्यामुळे पोलिसांच्या कोणत्याही बेकायदेशीर गुन्हेगारी कृत्यास खपवून घेतले जाणार नाही कोणताही पोलीस अधिकारी किंवा अंमलदार कोणत्याही बेकायदेशीर किंवा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी आढळून आल्यास त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles