बंधारा कम पुलामुळे बीड शहरासह परिसरातील गावांची भूजल पातळी वाढणार
बीड — शहरातील बिंदुसरा नदीच्या पात्रात पूल कम बंधारा बांधणीच्या कामाला अखेर सुरूवात झाली असून आ.संदीप क्षीरसागरांनी गुरूवारी (दि.३) रोजी या कामाचा शुभारंभ केला. आ.क्षीरसागर हे काम होण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या कामाची सुरूवात झाली असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. या पूल कम कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्यामुळे बीड शहर आणि परिसरातील आसपासच्या गावांमध्ये भूजल पातळीत मोठी वाढ होणार आहे. ही आनंदाची बाब आहे.
बीड शहरातील बार्शी नाक्याजवळील असलेल्या बिंदुसरा नदी पात्रात पूल कम कोल्हापूरी बंधारा तयार करावा. जेणेकरून बिंदुसरा नदीतून वाहून जाणारे पाणी अडविले जाईल. हे काम करण्यासाठी आ.संदीप क्षीरसागरांनी गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय लावून धरला. अशा स्वरुपातील हे काम असणार आहे. या कामाच्या मंजूरीसाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी अनेक वर्षे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. आणि अखेर आ.संदीप क्षीरसागरांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले आहे. बिंदुसरा नदीवरील बंधार्यामुळे बीड परिसरात सिंचन आणि पाणी उपलब्धतेसाठी मोठा फायदा होणार आहे. आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नांतून बीडसाठी अतिशय फायदेशीर असलेले हे काम लवकरच पूर्ण होणार आहे.
पूल कम बंधार्याचा सिंचन आणि पाणी साठवण्यासाठी मोठा फायदा
शुभारंभ झालेल्या बिंदुसरा नदीवरील पूल कम कोल्हापूरी बंधार्यामुळे बीड शहर आणि आजूबाजूच्या साधारण ५ किलोमीटर पर्यंतच्या परिसरात भूजल पातळीत वाढ होणार आहे. बीड जिल्ह्यात पावसाची अनियमितता असल्याने प्रत्येक उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होते. परंतु या कोल्हापूरी बंधार्यामुळे पाणी साठवणूक होईल. परिणामी पाणी उपलब्धता आणि शेती सिंचनासाठी याचा खूप मोठा फायदा या पूल कम बंधार्याचा होणार आहे. बिंदुसरा नदीवर बंधारा कम पूल ही संकल्पना मोठी दूरदर्शी होती. ती आ.संदीप क्षीरसागर यांनी डोळ्यासमोर ठेवून हे काम होण्यासाठी निरंतर प्रयत्न केले. शासन आणि प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. अनेकवेळा अधिवेशनातही हा मुद्दा मांडला. दरम्यान आता आ.संदीप क्षीरसागरांच्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच हे काम पूर्ण झालेले असेल.