Sunday, February 1, 2026

आयशर ची रिक्षाला धडक, चार ठार तर रस्त्यावरच्या भेगांनी घेतला एकाचा बळी

बीड — मेहकर-पंढरपूर या पालखी महामार्गावरील तेलगाव-माजलगाव रस्त्यावर रविवारी रात्री 11 वाजेदरम्यान अपघात होऊन त्यात चार जण ठार तर काही गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना माजलगाव येथील रूग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. मयतांमध्ये पती-पत्नीचा समावेश आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, आयशरने ऑटोला जवळपास 50 ते 60 फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. घटनास्थळी दिंद्रुड पोलीस तात्काळ दाखल झाले.
यासंदर्भात समजलेली माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील कांही लोक ऑटो क्र. एमएच 23 एन 0273 ने रविवारी अकरा ते साडे अकरा वाजेदरम्यान तेलगावकडून माजलगावकडे जात असताना सदरील ऑटो नित्रुड जवळील एका पेट्रोल पंपासमोर आला असता समोरून येणार्‍या आयशर क्र एमएच 23 एम 9255 ने ऑटोला जबरदस्त धडक दिली. आयशरने धडक देताच ऑटो जवळपास 50 ते 60 फूट दूर अंतरापर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात ऑटोमधील तीन जण जागीच ठार झाले असून, मयतात एका महिलेचा समावेश आहे. याशिवाय आणखी एकाचाही मृत्यू झाला आहे. सर्व जखमी गंभीर आहेत. त्यांना तेलगाव येथील रूग्णवाहिकेने माजलगाव येथील रूग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. यात फारूक चॉद सय्यद, त्यांच्या पत्नी सय्यद शबाना फारूक, शेख नोहिद एजाज आणि फैजान रफिक सय्यद अशी चौघांची नावे आहेत.
मयताच्या जवळ असलेल्या आधारकार्डवरून त्यांची ओळख झाली. अपघातातील इतर मयत व जखमींचे नावे उपलब्ध होऊ शकले नाहीत. आयशर चालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव ढाकणे यांच्यासह पोलीस कर्मचारी महेश साळुंखे, खलील मोमीन, सचिन गायकवाड, कानदास बनसोडे, चामनर आदि तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

रस्त्यावर पडलेल्या भेगांनी घेतला आणखी एक बळी

तेलगाव तालुका धारूर येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यात नोकरी असलेले महारूद्र भिमराव लोंढे (रा. खालापुरी ता. जि. बीड ह. मु. सुंदरनगर तेलगाव) हे दुचाकी क्र. एम. एच. 23- 7424 ने रविवार (1 जून 2025) रोजी दुपारी तेलगावकडून माजलगावकडे जात असताना तेलगाव- माजलगाव रस्त्यावर टालेवाडी नजीक रोडला पडलेल्या भेगा चुकवताना समोरून भरधाव वेगात येत असलेल्या ट्रक क्र. एम. एच. 44- 7371 जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की महारूद्र लोंढे यांची गाडी ट्रकच्या समोरच्या भागात अडकली, तर या अपघातात महारूद्र लोंढे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles