Sunday, December 14, 2025

आज खाकी वर्दी ही गहिवरली..! अश्रूंना मोकळी वाट मिळाली..! हरवलेल्या मुलाची आठ वर्षानंतर आईशी भेट झाली

AHTU आणि LCB टीमची संयुक्त कार्यवाही…

बीड — दाटलेला कंठ, माया ममतेच्या आनंदाश्रूत पोलीस अधीक्षक कार्यालय (SP office)भावनेच्या लाटेत चिंब झालेलं पाहायला मिळालं. गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी कठोरतेसाठी ओळख असलेली खाकी वर्दीतील माणूसपणाचं दर्शन घडलं. आठ वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेल्या मुलाचा शोध घेऊन तो अडाणी असलेल्या आई वडिलांच्या स्वाधीन केला. माय लेकराची भेट होत असताना अश्रूंच्या आलेल्या महापुरात खाकी ही काही काळ गहिवरल्याचं चित्र दिसलं.
सोळा वर्षाचा अल्पवयीन मुलगा राजु काकासाहेब माळी वर्ष (2017 चे वय) हा घरातून निघून गेला होता. याबाबत माहीती अशी की राजु हा दहावीचे शिक्षण घेण्यासाठी संगमेश्वर विद्यालय नालवंडी (sangameshwar School nalvandi)येथे शिकायला होता . त्याची राहण्याची सोय नसल्याने तो शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांच्या घरी राहत होता. आई वडीलांची परिस्थिती एकदम हलाखीची होती . आई वडील ऊसतोड कामगार असल्याने कर्नाटक राज्यात कामासाठी गेले होते. डिसेंबर 2017 मधे राजु हा शाळा सुटल्यावर कोणाला काही एक न सांगता निघून गेला. याबाबत त्याच्या आई वडिलांना माहिती मिळाली तेव्हा त्यांना कर्नाटक (Karnataka) वरून येण्यास आठ दिवस लागले. राजू चे आई वडिलांना वाटले की राजू काही दिवसात परत येईल, व ते दोघेही अशिक्षित असल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. असे करत पाच ते सहा वर्ष निघून गेले. पण राजु परत आलाच नाही, मग 2023 मधे त्याच्या आई ने पोस्टे पिंपळनेर (pimpalner police)ला गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा जानेवारी 2025 मधे मानवी तस्करी विरोधी पथक(Anti Human Trafficking Unit)ला वर्ग झाला. पीएसआय पल्लवी जाधव यांनी मानवी तस्करी विरोधी पथकाचा पदभार घेतल्यावर या गुन्ह्याच्या फाइल चे बारकाईने अवलोकन केले. आणि तपासास सुरवात केली. राजूच्या आईवडिलांची भेट घेतली त्यांचे अश्रु आणि दुःख खूप वेदनादायक होते. त्यानंतर राजूच्या शाळेत जावून त्याचे शिक्षकांची ही भेट घेतली व त्याच्या बाबत माहिती घेतली. त्यानंतर मागचे पाच वर्ष गुन्हा का दाखल झाला नाही म्हणून शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांची भेट घेतली. कारण सदर शिक्षकाच्या घरी राजू राहत होता, एखादा मुलगा आपल्या ताब्यातून निघून गेल्यावर त्याने गुन्हा दाखल का केला नाही? त्यांनीच राजु चे काही बरेवाईट तर केले नसेल ना असा संशय पीएसआय पल्लवी जाधव यांना आला. मग पीएसआय पल्लवी जाधव यांनी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (SP Navneet Kanvat) यांची भेट घेवून गुन्ह्याबाबत सर्व माहिती सांगितली व सदर शिक्षकावर संशय असले बाबत ही सांगितले. सरांनी सांगितले की तुम्ही पुढील तपासात स्थानिक गुन्हे शाखेची( LCb) मदत घ्या. व तसा आदेश त्यांनी पोनी शिवाजी बंटेवाड एलसीबी यांना दिला. पोनि बंटेवाड यांनी पीएसआय पल्लवी जाधव यांच्या मदतीसाठी पीएसआय श्रीराम खटावकर यांना आदेश दिला. त्यानंतर दोघांनी मिळून तपास सुरू केला. सदर शिक्षकाकडून काही एक माहिती मिळाली नाही. त्यानंतर पीएसआय खटावकर यांनी टेक्नीकल (technical team)टीम च्या मदतीने राजू ची माहिती काढली. मिळालेल्या माहितीवरून राजूचे लोकेशन पुणे (Pune) येथे असल्याचे समजले. व त्याला शोधून विश्वासात घेवून पुणे वरून बीड ला आणले.
आज सकाळी पीएसआय खटावकर यांनी राजू ला पुढील तपासकामी पीएसआय पल्लवी जाधव यांच्या ताब्यात दिले.त्यानंतर त्यास पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या समोर हजर केले. त्यावेळी तेथे राजूचे आई वडील ही हजर होते. त्यांच्यासाठी ही विशेष भेट एस पी नवनीत कांवत यांनी घडवून आणली.
दरम्यान ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव , पोलीस उप निरीक्षक श्रीराम खटावकर , पोलीस हवालदार असिफ शेख, आनंद म्हस्के, हेमा वाघमारे , उषा चौरे, प्रदीप येवले, अशोक शिंदे, पोना अर्जुन यादव, पोलीस शिपाई प्रदीप वीर, योगेश निर्धार सर्व नेमणूक मानवी तस्करी विरोधी पथक(AHTU )व स्थानिक गुन्हे शाखा ( LCB team) यांनी केली. पोलिसांच्या या कामगिरीचं जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles