अवैध वाळू वाहतूक करणारे २ हायवा पकडले; ५०लाखाचा मुद्देमाल जप्त

0
119

गेवराईचकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील बोरगाव फाटा येथील गोदापात्रातून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच शुक्रवारी दोन हायवावर कारवाई केली. पोलिसांनी यावेळी ५० लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतून अवैध वाळू उपसा केला जात असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते आहे. बोरगाव परिसरात शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने पाठलाग करून दोन वाळूने भरलेल्या हायवावर कारवाई करत एकूण ५० लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून सर्फराज राजू पठाण वय २९ वर्ष रा. महारटाकळी ता. गेवराई जी. बीड व अशोक दत्तात्रय रकटे वय ३६ वर्ष रा.मुंगी ता. शेवगाव जि. आहिल्यानगर या दोघांवर चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलिस अधीक्षक नवनित कॉवत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि शिवाजी बंटेवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि खटावकर, श्री. यादव, बबन सलगर, विकास राठोड, अंकुश वरपे यांनी केली असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here