मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र
बीड — बीड विधानसभा क्षेत्रात Beed Assembly Constituency मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे heavy rain मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करुन सरसकट नुकसान भरपाई crop compensation for damages देण्याची मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
बीड विधानसभा क्षेत्रातील बीड व शिरूर (का) तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या क्षेत्रातील उभा असलेला कापूस, सोयाबीन, बाजरी आदीं पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पशुहानीसह शेतकरी व ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या घरांचे, पिकांचे व पशुहानीचे तातडीने पंचमाने करण्यासाठी बाबतचे आदेश विभागाला द्यावेत, जेणेकरून शेतकरी बांधवाला सरसकट आर्थिक मदत मिळेल. अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर Sandeep Kshirsagar मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.

