अंबाजोगाई-लातूर रोडवर भीषण अपघात; 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

अंबाजोगाई (बीड) – अंबाजोगाई-लातूर महामार्गावर लोखंडी सावरगाव परिसरात भीषण अपघाताची घटना घडली असून, या अपघातात 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव अथर्व महादेव ढगे (रा. धानोरा खुर्द, ता. अंबाजोगाई) असे आहे.

कसा झाला अपघात?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व ढगे हा आपल्या मोटारसायकलवरून (MH 44 D 7483) धानोरा (खुर्द) येथून अंबाजोगाईकडे जात होता. त्याचवेळी अंबाजोगाईहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी शिवाई बस (MH 49 BZ 9581) समोरून येत होती.
लोखंडी सावरगाव जवळ एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल आणि बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की मोटारसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने अथर्व ढगे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

 कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अथर्व हा अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याला एक विवाहित बहीण आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याच्या आई-वडिलांनी त्याला किराणा दुकान सुरू करून दिले होते आणि तो त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles