Home Blog Page 99

ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून निवृत्त नायब तहसीलदाराला जाळ्यात ओढले; मुक्ताई अर्बन सोसायटीवर गुन्हा दाखल

0

माजलगाव — पतसंस्था सोसायटी या माध्यमातून खातेदारांच्या आर्थिक फसवणुकीचे प्रकार उघड होत आहेत. माजलगाव मधील मुक्ताई अर्बन को. ऑप. क्रे. सोसायटी जुना मोंढा शाखेतील खातेदार असलेल्या निवृत्त नायब तहसीलदारांची 23 लाख रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दामोदर घाटूळ यांच्या फिर्यादीवरून मल्टीस्टेटचे अध्यक्ष विश्वंभर शिंदेसह 20 जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेवानिवृत्त नायब तहसीलदार दामोदर गणपतराव घाटूळ हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे मोठी रक्कम आली होती. त्यांच्या घराशेजारी किरायाने राहणारे शिवप्रसाद सक्राते, विठ्ठल सक्राते व रमेश यादव यांनी घाटूळ यांच्या घरी जाऊन मुक्ताई अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये जादा व्याजदर देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यांनी पतसंस्थेत तब्बल 27 लाख रुपये गुंतवले. मात्र पतपेढी बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यावरून गुंतवणुकीची काही रक्कम काढून घेतली. परंतु दामोदर घाटूळ यांना पैशाची गरज पडल्यामुळे त्यांनी पतसंस्थेकडे आपल्या ठेवी परत कराव्यात अशी मागणी केली. विविध कारण देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केली जाऊ लागली. दरम्यान 23 लाख रूपयांची रक्कम व्याजासह परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार घाटूळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.
या प्रकरणी दामोदर घाटुळ यांच्या फिर्यादीवरून मल्टीस्टेटचे अध्यक्ष विश्वंभर पांडुरंग शिंदे, अशोक विठ्ठल जोगडे, विलास निवृत्ती सौंदर, भागवत संभाजी गंगाञे, विशाल श्याम गोरे, केशव साहेबराव जोगडे, स्वाती विठ्ठल सक्राते, जनाबाई अनंतराव कदम, अशोक रतन चिगुरे, मोतीराम केशव शिरसाट, परमेश्वर लक्ष्मण कोरडे, शिवप्रसाद सर्जेराव सकारात्मक, विठ्ठल संक्राते, उद्धव केशव जोगडे, महेश फपाळ, किसन कुंडकर, बालाजी कुंडकर, दीपक कटके, रमेश दगडूबा यादव, रुस्तुम काळे या वीस जणांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये माजलगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताई अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवप्रसाद सर्जेराव सक्राते यांच्यावर यापूर्वी तीन अपहाराचे गुन्हे दाखल असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय केरबा माकने हे करत आहेत.

पेट्रोल- डिझेल काहीसं स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा

0

नवी दिल्ली — आजच्या दिवशी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवे दर जाहीर केले असून, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झाल्याचे दिसून आले आहे.

इंधनाच्या किंमतीमध्ये होणाऱ्या चढ-उतारामुळे सामान्य नागरिकांच्या बजेटवर मोठा परिणाम होतो, आणि आज पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्यामुळे अनके ग्राहकांना खुशखबर मिळाली आहे. तर चला जाणून घेऊयात , आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर .

शहरानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर

सातारा – पेट्रोल 104.76 आणि डिझेल 91.25
सांगली – पेट्रोल 104.48 आणि डिझेल 90.79
कोल्हापूर – पेट्रोल 104.14 आणि डिझेल 90.66
अहमदनगर – पेट्रोल 104.59 आणि डिझेल 91.40
अकोला – पेट्रोल 104.22 आणि डिझेल 90.68
अमरावती – पेट्रोल 104 . 80 आणि डिझेल 91. 37
औरंगाबाद – पेट्रोल 105 . 50 आणि डिझेल 92.03
भंडारा – पेट्रोल 105.08 आणि डिझेल 91. 61
बीड- पेट्रोल 104.49 आणि डिझेल 91.33
बुलढाणा – पेट्रोल 104.88 आणि डिझेल 91. 90
चंद्रपूर – पेट्रोल 104.10 आणि डिझेल 90.67
धुळे – पेट्रोल 104.62 आणि डिझेल 91.10
गडचिरोली – पेट्रोल 105 आणि डिझेल 91.57
गोंदिया- पेट्रोल 105.50 आणि डिझेल 91.95
हिंगोली- पेट्रोल 105.16 आणि डिझेल 92.3
जळगाव – पेट्रोल 105.20 आणि डिझेल 91.23
जालना – पेट्रोल 105.30 आणि डिझेल 92.3
लातूर – पेट्रोल 105.42 आणि डिझेल 91.83
मुंबई शहर- पेट्रोल 103.50 आणि डिझेल 90.3
नागपूर – पेट्रोल 104.5 आणि डिझेल 90.65
नांदेड – पेट्रोल 105 . 49 आणि डिझेल 92 .3
नंदुरबार- पेट्रोल 104.81 आणि डिझेल 91.48
नाशिक – पेट्रोल 104.40 आणि डिझेल 91.7
उस्मानाबाद – पेट्रोल 104.78 आणि डिझेल 91.85
पालघर -पेट्रोल 103.75 आणि डिझेल 90 . 73
परभणी पेट्रोल 105.50 आणि डिझेल 92.3
पुणे- पेट्रोल 104.14 आणि डिझेल 90.88
रायगड- पेट्रोल 103.96 आणि डिझेल 90.62
रत्नागिरी – पेट्रोल 103.96 आणि डिझेल 91.96
सिंधुदुर्ग – पेट्रोल 105.50 आणि डिझेल 92.3
सोलापूर – पेट्रोल 105.10 आणि डिझेल 91 .23
ठाणे – पेट्रोल 103.68 आणि डिझेल 90.20
वर्धा- पेट्रोल 104.80 आणि डिझेल 91.44
वाशिम – पेट्रोल 105.05 आणि डिझेल 91.43
यवतमाळ – पेट्रोल 105.50 आणि डिझेल 92.3

सामान्य नागरिकांना दिलासा –

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या चढ-उतारानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर  बदलत असतात. यावर अतिरिक्त घटक म्हणजे स्थानिक कर, व्हॅट आणि मालवाहतूक शुल्क यांचा देखील प्रभाव पडतो. त्यामुळे, प्रत्येक राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती वेगवेगळ्या असू शकतात. आजच्या दिवशी महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झाल्यामुळे सामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

अंजली दमानिया फोडणार नवा बॉम्ब; धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा !

0

मुंबई — संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील रान उठवले आहे. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडदेखील या प्रकरणात आरोपी आहे.या मु्द्यावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले ट्वीट चर्चेत आले आहे.

https://x.com/anjali_damania/status/1886119078643060795

राज्यातील विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत. तर, दुसरीकडे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर याआधी टीका केली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे. तर, मुंडे यांनी आपला राजीनामा मागण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच असल्याचे स्पष्ट केले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कराड आणि मु्ंडे यांचे व्यावसायिक संबंधाची कागदपत्रे दमानिया यांनी सादर केली. मात्र, त्यानंतरही मुंडे यांचा राजीनामा मान्य झाला नााही. या पार्श्वभूमी अंजली दमानिया यांनी एक सूचक ट्विट केले आहे.अंजली दमानिया यांनी म्हटले की, ‘हे सगळे पुरावे अतिशय धक्कादायक आहेत, ते उद्या जनतेपुढे येतील, त्यानंतर नक्कीच मोठा निर्णय घ्यायला जनता सरकारला भाग पाडेल. मंगळवारी सकाळी 11 वाजता माझ्या घरून पत्रकार परिषद घेणार आहे. हे भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा. या पुराव्यांवर आपण मागील 4 दिवस काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.’

धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहे, तोपर्यंत इथे न्याय होणार नाही- अंजली दमानिया

नामदेव शास्त्री महाराज जर खरंच देशमुख कुटुंबीयांचा पाठीमागे असतील, तर त्यांनी त्या देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी जी विघ्न आहेत ती दूर करावी अशी विनंती आहे. त्यातला सर्वात मोठा विघ्न म्हणजे धनंजय मुंडे…धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहे, तोपर्यंत इथे न्याय होणार नाही. म्हणून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं काम आता भगवानगडानेच करायला हवं. त्यानंतरच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेल, असं अंजली दमानिया यांनी सांगितले.

घरात घुसून शेतकऱ्याच्या गळ्याला चाकू लावला; दीड लाखाची लूट

0

आष्टी — पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश करून शेतकऱ्याच्या गळ्याला चाकू लावला. शेळी म्हैस विक्रीतून आलेल्या दीड लाख रुपयांची लूट केली. ही घटना तालुक्यातील शेकडे वस्तीवर रविवारी पहाटे घडली.

आष्टी तालुक्यातील महिंदा येथील शेकडे वस्तीवर शेतकरी मोहन शेकडे कुटुंबासह राहतात. शनिवारी रात्री जेवण करून शेकडे कुटुंब घरात झोपले होते. रविवारी पहाटे 2 वाजेच्या दरम्यान घराची कडी उघडून चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी शेकडे यांना जाग आली असता चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला गळ्याला चाकू लावला. तसेच आरडाओरड करू नये म्हणून तोंड दाबून धरले. इतर चोरट्यांनी घरात शोधाशोध करत पत्र्याची पेटी ताब्यात घेतली. याचवेळी एका चोराने वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोने तोडले, मात्र, शेकडे कुटुंबीयांनी आरडाओरड केला असता सोने तिथेच सोडून घरातील पेटी घेऊन चोरटे पळाले. आवाज ऐकून आलेल्या शेजाऱ्यांनी चोरांचा पाठलाग केला. परंतु, अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. पेटी अर्धा किलोमीटर अंतरावर आढळून आणि. त्यातील दीड लाख रूपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. ही रक्कम शेती विक्री आणि शेळी, म्हैस विक्रीतून मिळाली होती.
माहिती मिळताच घटनास्थळी आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे, अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परशूराम मंजुळे यांनी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक,ठसे तज्ज्ञांनी तपास केला. या प्रकरणी मोहन शंकर शेकडे याच्या फिर्यादीवरून रविवारी अंमळनेर पोलीस ठाण्यात चार चोरट्याविरूध्द कलम 309(4), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा चव्हाण करीत आहेत.

बीडकरांची स्वप्नपूर्ती: विघनवाडी बीड रेल्वे मार्गाची होणार चाचणी

0

बीड — अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू असून बीड करांची स्वप्नपूर्ती होणार आहे. विघनवाडी ते राजुरी आणि राजुरी ते बीड या दरम्यान नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी 4/5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी रेल्वे मार्गापासून दूर राहण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच याबाबत रेल्वे प्रशासनाने जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही याची माहिती दिलेली आहे.

बीडकरांच्या दोन-तीन पिढ्यांनी बघितलेले रेल्वेचे स्वप्न आता पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसत आहे. मध्यंतरी रेल्वेच्या‌ रखडलेल्या कामाने गती घेतली आहे. 5 जानेवारी 2024 रोजी आष्टी ते अंमळनेर या ३० किलोमीटरच्या मार्गावर 110 किलोमीटर प्रति तास या वेगाने हायस्पीड चाचणी घेण्यात आली. त्यानंतर विघनवाडी ते राजुरी या नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी 30 ते 31 डिसेंबरदरम्यान घेण्यात आली. दरम्यान आता पुढील चाचणीचा टप्पा पार पडत आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. आता मंगळवारी पुढील टप्पा पार पडत आहे. 4 फेब्रुवारी रोजी विघनवाडी ते राजुरी आणि 5 फेब्रुवारी रोजी राजुरी ते बीड या मार्गावरील रेल्वे लोहमार्गाची जलदगती चाचणी पार पडून बीड करांची स्वप्नपूर्ती बुधवारी होणार आहे.त्यामुळे चाचणीलगत येणाऱ्या गावकऱ्यांनी रेल्वे मार्गापासून दूर राहावे. तसेच गुरे, पाळीव प्राणी इत्यादी चाचणी दरम्यान रुळावर येणार नाहीत याची काळजी घ्यावी. लोहमार्गालगत चाचणी दरम्यान कोणीही वावरू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या संबंधीचे पत्र उपजिल्हाधिकारी समन्वय यांनी पाटोदा, बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.

बीड : जिल्ह्यात 183 शस्त्र परवाने रद्द, शस्त्र परवाना असणाऱ्यांच्या घरी पोलिसांच्या चकरा

0

बीड — मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दहशत, सत्ता, पैसा आणि बीडच्या वाळू माफिया आणि राखेचं भयानक वास्तव समोर आलं. हे वास्तव समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.पवनचक्की प्रकरणाप्रमाणेच बीडमध्ये बंदुकीचा धाक दाखवणाऱ्यांच्या संख्येत कमी नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी हवेत गोळीबार करणाऱ्यांच्या वायरल व्हिडीओने मोठी खळबळ माजली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर प्रशासन सतर्क झाला आहे. बीड जिल्ह्यात 183 शस्त्र परवानगी रद्द करण्यात आली आहे.

127 शस्त्र आणखी रद्द होणार आहेत. यामध्ये 8 जणांनी स्वतः सरेंडर होत आपली शस्त्रे जमा केली आहेत. सत्ता श्रीमंती आणि वर्चस्व दाखवण्याची हाऊस जपणाऱ्या बीडच्या शस्त्र परवानाधारकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने उलटून गेल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे .घाऊकपणे दिल्या जाणाऱ्या शस्त्र परवानांच्या तपासणीसाठी आता पावलं उचलली जात आहे. बीड जिल्ह्यात नोंदणीकृत 1281 शस्त्र परवाने आहेत. यात 310 प्रस्ताव रद्द करण्यासाठी पाठवण्यात आले असून यावर कारवाई करत आत्तापर्यंत 183 शस्त्र रद्द करण्यात आले आहेत. 127 शस्त्र रद्द होणार असल्याचा सांगण्यात आलंय. यात मृत असताना हे शस्त्र परवाना नावावर असणाऱ्यांची संख्या 118 एवढी आहे. ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यात ज्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे, त्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून पोलीस कर्मचारी घरी जाऊन परवानाधारक शस्त्र हाताळण्यास सक्षम आहे का ? जिवंत आहे का ? याची खात्री करत आहेत. यात अनेक जण मृत असल्याचे समोर आले आहे. मृत असतानाही शस्त्र परवाना नावावर असणाऱ्यांचा आकडा 118 असल्याचे समजते .त्यामुळे आता हे सर्व शस्त्र परवाने रद्द केले जाणार आहेत .
शस्त्र परवाना असणाऱ्यांच्या घरी पोलिस
विशेष म्हणजे जिल्ह्यात ज्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे, त्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून पोलीस कर्मचारी घरी जाऊन परवानाधारक शस्त्र हाताळण्यास सक्षम आहे का ? जिवंत आहे का ? याची खात्री करत आहेत. यात अनेक जण मृत असल्याचे समोर आले आहे. मृत असतानाही शस्त्र परवाना नावावर असणाऱ्यांचा आकडा 118 असल्याचे समजते .त्यामुळे आता हे सर्व शस्त्र परवाने रद्द केले जाणार आहेत .

भगवानगड संतोष देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी — महंत नामदेव शास्त्री

0

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची मानसिकता सुद्धा तपासावी लागेल. धनंजय मुंडे यांना नाहक त्रास दिला जात आहे. असं वक्तव्य केल्यानंतर महंत नामदेवशास्त्री यांच्यावर राज्यभरातून टीकेची जोड उठली.आपली बाजू समजावून सांगण्यासाठी आज देशमुख कुटुंबिय गडावर पोहचले. त्यांनी महंतांची भेट घेतली. त्यांनी संतोष देशमुख यांच्या खूनामागील खरं कारण, आरोपींचा पूर्व इतिहास, त्यांची गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, त्यांच्यावरील गुन्ह्यांचा कच्चाचिठ्ठाचा महाराजांपुढे मांडला. आरोपींच्या गुन्ह्याचा पाढा वाचून संतोष देशमुख यांचे काय चुकले असा प्रश्न केला. धनंजय देशमुख यांच्या आर्त हाक नामदेव शास्त्री यांनी ऐकली. त्यांनी लागलीच भगवानगड हा देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले.

महंतांच्या भेटीला गेलेल्या देशमुख कुटुंबाने कधीच जातीवाद केला नाही, असे धनंजय देशमुख यांनी सांगितले. देशमुख कुटुंबियांची जमीन मुंडे कुटुंब दोन पिढ्यांपासून कसत आहे, त्याची माहिती त्यांनी महंतांना दिली. प्रामाणिकपणे सांगतो. मनोहर मुंडेंचे चार मुले होते.दोन मुले पुण्यता होते. दोन मुले इथे. त्यांनी जे पिकवलं ते आम्ही खातो. देशमुख कुटुंबाने जातीवाद केला असता तर त्याच्या हत्येनंतर दिसलं असतं. दलित बांधावाला वाचवण्यासाठी गेला. असे धनंजय देशमुख म्हणाले.

आमची कोणतीही गुन्हेगारी नाही. १५ वर्ष सरपंच राहिलेल्या माणसाशी या लोकांनी संपर्क साधायला हवा होता. आरोपींवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आरोपींची मानसिकता तपासण्याची गरज आहे. ज्याला आरोपींची बाजू घ्यायची त्यालाच जातीयवादाचा अंश येत आहे. आम्ही सर्व दाखवलं आहे. यांच्या कार्यालयात बसायचे. त्यांच्या गाडीत फिरायचे, असे देशमुख म्हणाले.
संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर हत्या झाली
आहे. प्रत्येक क्षेत्रातील लोक आपल्यासोबत आहे. राजकीय नेते, संप्रदायाचे लोक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते आमच्यासोबत आहेत. न्यायाच्या भूमिकेत आहेत. अशावेळी लोकप्रतिनिधींना जातीयवादी म्हणू नका. नाही तर ते कोणत्याच न्यायाच्या भूमिकेत येणार नाही. न्याय मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना चुकीचं ठरवू नका, ही न्याय ची लढाई आहे.अशी विनंती धनंजय देशमुख यांनी केली.
दरम्यान देशमुख कुटुंब भगवान बाबाला मानणारं आहे. जातीय सलोखा या गावात होतं. यापूर्वी किती वेळा गडावर आले हे त्यांनी दाखवलं. भगवान गड तुमच्या पाठी कायम राहील ही ग्वाही देतो, असे वक्तव्य नामदेव महाराजांनी केले. भगवान गडाला मानणारं कुटुंब आहे. यापूर्वी ते गडावर येत होते. आरोपींची पार्श्वभूमी असलेले पुरावे त्यांनी दिले आहेत. धनंजय यांचं म्हणणं आहे की, याला जातीयवादाचं स्वरुप देऊ नका,. भगवान गड कायम स्वरुपी देशमुख कुटुंबाच्या पाठी उभं राहील. आरोपींची खरी पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्यावर गुन्हे किती आहे, ते त्यांनी दाखवलं.

संतोष अण्णाने किती काम केलं हे त्यांनी दाखवलं. ते मूळचे बाबाचे आहेत. हे आज कळालं. त्यांची जमीन तीन पिढ्यांपासून वंजारी कुटुंब करत आहे. जातीयवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे गादीवरून सांगणं आहे. आम्ही बसून बोलू. त्यांना दोन घास खाऊ घालू. त्यांना प्रसाद देऊ. संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळेल, असे महंत म्हणाले.

मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; तरुणाची आत्महत्या

0

छत्रपती संभाजीनगर — मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने नुकतेच जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान मराठा आरक्षणाची लढाई सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगर मध्ये एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपली जीवन यात्रा संपवली

सिल्लोड येथे एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी जीव दिला आहे. शेततळ्यात उडी मारून त्याने आत्महत्या केली. समाधान रायभान काळे (वय ३८ ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. समाधान याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षणासाठी सरकारकडून फसवणूक होत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आपण जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे.
समाधान काळे या तरुणाचे बारावीपर्यंत शिक्षण झालं असून तो सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथील रहिवासी होता. समाधान याने शनिवारी गावाजवळील शेततळ्यात उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. त्याच्याजवळ पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीत आत्महत्येचं कारण नमूद केलं आहे. या आत्महत्येनं तरी सरकारचे डोळे उघडतील, अशी आशा त्यांनी चिठ्ठीत व्यक्त केली आहे.

तरुणाकडे सापडलेल्या चिठ्ठीत म्हटले की, सततची नापिकी आणि शेकडो मोर्चे-आंदोलनं करुन देखील मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे. या सगळ्याला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. या आत्महत्येनं तरी सरकारने डोळे उघडावेत. गरजवंत मराठा समाजाला आता तरी शासनाने न्याय द्यावा. एक मराठा लाख मराठा, असं चिठ्ठी लिहून समाधानने आपलं जीवन संपवलं आहे.

माझ्या वडिलांना हाल हाल करून मारलं आमची मानसिकता काय असेल? वैभवी ने नामदेव शास्त्रींना सुनावलं

0

तुम्ही आमची बाजू ऐकून घ्यायला हवी होती!

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे चे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचे नाव पुढे आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.या
प्रकरणात भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडेंची बाजू घेतल्यामुळे त्यांच्यावरही सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. दरम्यान संतोष देशमुखांच्या कुटुंबाने आज भगवान गडावर जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतली आणि त्यांना या प्रकरणातील सर्व पुरावे दाखवले. यावेळी वैभवी देशमुखने शास्त्रींना थेट सुनावले.

संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय आणि मुलगी वैभवीने भगवान गडावर महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संतोष देशमुखांच्या खूनामागील खरे कारण, आरोपींचा इतिहास, त्यांची गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, त्यांच्यावरील गुन्ह्यांचा कच्चा चिठ्ठाच महाराजांपुढे मांडला. यावेळी ‘आपण माझ्यापेक्षा खूप मोठे आहात, तमाम भक्तांचे गुरू आहात पण आपण केलेले विधान हे आम्हाला पटले नसल्याचं, संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुख हिने भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींना ऐकवले. नामदेव शास्त्रींना बोलताना वैभवी म्हणाली, ‘आम्ही बातम्यांमध्ये ऐकले, माझ्या वडिलांच्या अंगावर इतके वार झाले, त्यांचा एकही अवयव शाबूत ठेवला नाही. त्यांच्या अस्थी मध्येही फक्त तीन हाडं निघाली. आमची मानसिकता काय असेल? आज आमच्या वडिलांचे फोटो बघावे वाटत नाहीत. मला फक्त एवढे वाटते की, माझ्या वडिलांची हत्या कशी झाली, त्यामागचे कारण काय, तेवढे वक्तव्य करण्यापूर्वी समजून घ्यायला हवे होते, आमची बाजू ऐकायला पाहिजे होती आणि मगच वक्तव्य करायला पाहिजे होते.’
‘गुन्हेगारी वृत्तीमुळे माझ्या वडिलांची हत्या झाली. ज्यांना आरोपींचे समर्थन करायचे आहे, त्यांनी ते करावे, आम्ही त्यांच्याबाबत बोलत नाही. हे लोक जातीयवाद वाढवत आहेत. माझ्या वडिलांनी कधीच जातीवाद केला नाही. जो माणूस दलित व्यक्तीला वाचवण्यासाठी गेला, त्याला न्याय मिळण्यात फाटे फुटत आहेत. आम्ही अजूनही दुखातून सावरू शकलो नाही. त्यांच्या न्यायासाठी आजही झुंझावे लागत आहे. ही घटना घडली, अशी पुढे घडू नये, त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे,’ असं वैभवी यावेळी म्हणाली.
दरम्यान नामदेव शास्त्रींनी
‘मी तुमच्या पाठिशी आहे. हा प्रकार समाजातील वाईट लोकांनी केलेला आहे. तुम्ही भगवान गडाचे शिष्य आहात. मस्साजोग-केज तालुका बाबांना मानणारा आहे. माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल. मी कधीही गुन्हेगाराच्या पाठिशी नाही. भगवान गड आपल्या सदैव पाठिशी आहे. मी भगवान बाबाला प्रार्थना करतो, लवकर न्याय मिळावा. आरोपीचे कधीही समर्थन करत नाही. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ निघाला. महाराष्ट्राला विनंती आहे. या प्रकरणाला जातीय रंग न देता न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न करावे,’ असे स्पष्टीकरण नामदेव शास्त्रींनी दिले.

लिंबागणेश बसस्थानकावरील साधना मेडिकल चोरट्यांनी फोडले 

0

लिंबागणेश —  बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील बसस्थानकस्थित एकनाथ तागड यांच्या मालकीचे साधना मेडिकल अँड जनरल स्टोअर्स आज दि.०१ शनिवार रोजी पहाटे ४ वाजता चोरट्यांनी फोडल्याचे आढळून आले. दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असुन मेडिकल स्टोअर्स वरील मराठवाडा अर्बन को.आप क्रेडिट सोसायटी लिमिटेड बँक बीड शाखा लिंबागणेश येथील सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्यात आले आहेत. संबंधित प्रकरणी नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनि चंद्रकांत गोसावी यांना फोनवरून कल्पना दिली आहे.
साधना मेडिकल स्टोअर्सचे मालक एकनाथ तागड यांच्या म्हणण्यानुसार ते रात्री २ वाजता ज्वारी ,गहु भिजण्यासाठी रानात गेले होते. सकाळी ६ वाजता त्यांना त्यांचे दुकान फोडले असल्याचा फोन आला. दुकानात येऊन सीसीटीव्हीत पाहिले असता पहाटे ४ वाजता ३ जण तोंडावर रूमाल बांधुन कटर,टांबी ईतर साहित्याच्या सहाय्याने शटरचे दोन्ही कुलुप तोडून आत शिरून गल्ल्यातील पैसे काढून घेत असल्याचे दिसत आहे. एकनाथ तागड यांच्या म्हणण्यानुसार गल्ल्यातील ५००० रूपये चोरट्यांनी लंपास केले.