Home Blog Page 93

एस पीं सोबत दिलजमाई; पवन ऊर्जा कंपन्यांची ही मोगलाई!

0

कंपन्यांच्या नित “नव” दादागिरीने शेतकरी मात्र कावत (संताप) आहे ?

बीड — पाऊल ठेवताच पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पवन ऊर्जा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. बिनधास्त काम करा मी तुमच्या पाठीशी आहे असं म्हणत दिल जमाई केली. मात्र पवन ऊर्जा कंपन्यांनी याचाच गैरफायदा घेत मोगलाई सुरू झाल्याचं चित्र उभं केलं. उभी पिक उध्वस्त करत शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा सपाटा लावला. पण प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी म्हणून गाजावाजा करून घेणारे एस पी कावत यांनी शेतकऱ्यांची बाजू मागणी करूनही ऐकून घेण्याची तसदी घेतली नाही किंवा त्यांना गरजही वाटली नाही. ते कंपन्यांच्या संरक्षणासाठी आले आहेत की सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी जिल्ह्यात आले आहेत असा प्रश्न मात्र निर्माण होऊ लागला आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर हा प्रश्न राज्यातच नव्हे तर देशभरात गाजला. त्यातूनच प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी जनतेला न्याय देईल यासाठी नवनीत कावत यांच्याकडे जिल्ह्याची सूत्र दिली. बीडमध्ये पाऊल ठेवताच मी आधी पूर्ण अभ्यास करून नंतरच पावलं उचलेल कायद्याचं राज्य स्थापन करेल अस आश्वासन दिलं. त्या अनुषंगाने पावलंही उचलली. वाळू तस्करी ला आळा घालण्यासाठी जेसीबी, ट्रॅक्टर, हायवा यांच्यावर मोलमजुरी करणारी पण गुन्हे दाखल असणारी मंडळी एसपी कार्यालयात बोलावून दम भरला गेला. तीच स्थिती गुटखा माफीयांच्या बाबतीत देखील आहे.

गुटखा विक्री करणाऱ्या टपऱ्यावर कारवाई करण्यात आली पण गुटखा माफियांच्या तस्करीला आळा घालण्यात सपशेल यंत्रणा फेल ठरली. त्यामुळे गुटखा विक्री अजूनही जिल्ह्यात सुरूच आहे. चिल्लर चालर गुन्हेगारांना बोलावून देखील यापुढे गुन्हे केले तर याद राखा अशी तंबी दिली. पण गुन्हे घडवून आणणाऱ्या मास्टर माईंड अद्याप एकही पोलिसांच्या हाती सापडला नाही किंवा तशी ठोस कारवाई. केली गेली नाही. पोलीस दलातच अनेक जण वाळू तस्करीत गुंतलेले आहेत. ते तस्कर सापडून त्यांच्यावर देखील कारवाई झालीच नाही. एकूणच स्टंटबाजीच्या माध्यमातून पोलीस अधीक्षकांची वाहवाई मोठ्या प्रमाणावर माध्यमातून झाली असली तरी शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र त्यांचं धोरण सापत्न पणाचच राहिला आहे. विकासाच्या नावाखाली पवन ऊर्जा कंपन्यांनी घातलेला धुडगूस एसपींना दिसलाच नाही. किंवा मग धृतराष्ट्रासारखी त्यांनी भूमिका घेतल्यामूळेच पवन ऊर्जा कंपन्यांनी मोगलाई सुरू केली आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पवन ऊर्जा कंपन्यांना अश्वस्त करण्यासाठी वेळ मिळाला. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची देखील बैठक घेऊन अश्वस्त करावं अशी मागणी केली. सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाला एस पी नी केराची टोपली दाखविली. त्यांना वेळ मिळालाच नाही. किंवा त्यांना शेतकऱ्यांची कैफियत ऐकून घेण्याची गरज वाटली नाही मेले तर मरू बापडीचे असाच जणू त्यांनी संदेश दिला आहे. जमिनीचा मोबदला न देणे, कराराचे पालन न करणे, संपादित क्षेत्रापेक्षा जास्तीचे अतिक्रमण करणे,जाब विचारलाच तर दांडगाई करणे असे नव “नीत” किस्से रोज ऐकायला मिळू लागले आहेत. रोहित ढास या शेतकऱ्याची मुळूकवाडी शिवारात गट क्रमांक 657 मध्ये जमीन आहे. या जमिनीलगतच रिन्यू ग्रीन एम एच पी वन प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली ही कंपनी पवनचक्की उभा करत आहे. उभारणीसाठी रस्ता म्हणून रोहित ढास या शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून या कंपनीने कुठलाही मोबदला अथवा संबंधित शेतकऱ्याची परवानगी न घेता रस्ता म्हणून जमिनीचा वापर सुरू केला आहे. याच जमिनीतून पोकलेन, जेसीबी, जीप, पिक अप यासारखी वाहन घेऊन जात शेतकरी देशोधडीला लावून उध्वस्त करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे संबंधित शेतकऱ्यांने जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना देखील निवेदन दिलं आहे. या निवेदनाला देखील दोन दिवस उलटून गेले आहेत. अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनी देखील कर्तव्य दक्ष पणा दाखवला नाही. पोलीस अधीक्षकांची देखील तीच स्थिती पाहायला मिळत आहे. एकंदरच जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचं धोरण शेतकऱ्यांच्या नाश्याचच आहे. तर पोलीस अधीक्षक यांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी मात्र नव “नीत” होणाऱ्या अन्यायामुळे कावत ( संतापणे )आहे.

पवन ऊर्जा प्रकल्पाशी निगडित व्यवहाराची कायदेशीर बाबी व अनिश्चितता तपासण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली होती ती फक्त कागदावरच राहिली. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत तर मुख्य कार्यकारी अधिकारी जि प तसेच पोलीस अधीक्षक सदस्य आहेत. मात्र पवन ऊर्जा प्रकल्पासंदर्भात शेतकऱ्यांकडे जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.यासाठी कागदावरील समित्या प्रत्यक्षात उतरावाव्यात
       डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
              सामाजिक कार्यकर्ते

बीडच्या पाणीपुरवठ्याप्रश्नी आ.संदीप क्षीरसागरांकडून पुन्हा अजितदादांची भेट

0

उन्हाळ्यापूर्वी सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी आ.क्षीरसागरांचा पाठपुरावा सुरू

जुन्नर  — बीड शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आ.संदीप क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आताही रविवारी (दि.१६) रोजी जुन्नर येथे आ.संदीप क्षीरसागर यांनी दुसर्‍यांदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांची याच संदर्भात भेट घेतली.


बीड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत अटल योजना आणि बिंदुसरा धरण आणि माजलगाव बॅकवॉटरमध्ये पाण्याची पुरेशी उपलब्धता आहे. मात्र नगरपालिकेकडे महावितरण कंपनीचे ३६ कोटी रुपयांचे वीजबिल थकलेले आहे. त्यामुळे अमृत अटल पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेले नवीन वीज कनेक्शन देण्यात येत नसल्याने पाणी उपलब्ध असताना देखील बीड शहराला पाणी मिळत नाही. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून विधीमंडळ अधिवेशनात, शासनाकडे, प्रशासकीय स्तरावर आणि न्यायालयात देखील हा बीडकरांचा मुलभूत प्रश्न मांडला आहे. सुयोगाने कर्तव्यदक्ष नेते ना.अजित दादा पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आले असल्यामुळे आ.संदीप क्षीरसागर याविषयी ना.अजितदादांकडे या विषयात न्याय मागत आहेत. आ.क्षीरसागर यांनी याच विषयावर दोन आठवड्यांपूर्वी मुंबई येथे ना.अजितदादांची भेट घेतली होती. आता पुन्हा याच विषयावर आ.क्षीरसागरांनी ना.अजितदादांची रविवारी (दि.१६) रोजी जुन्नर येथे भेट घेतली. यावेळी ना.अजित दादा पवार यांनी विद्युत विभागाचे व्यवस्थापकीय संचालक यांना याविषयी तातडीने मार्ग काढण्यासाठी आदेश दिले आहेत‌. उन्हाळ्याच्या पूर्वी बीड शहराचा पाणीपुरवठा ना.अजितदादांच्या माध्यमातून सुरळीत होईल आणि गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बीडकरांच्या मुलभूत सोयीसाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश येईल असा विश्वास आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

धनंजय मुंडे राजीनामा देणार?, अजित पवार यांच्या वक्तव्याने खळबळ

0

मुंबई — महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून अन्न-नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे.त्यांच्याविरोधात गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी मोठं वक्तव्य करत चर्चांना अधिक रंगत आणली आहे.

‘सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता, त्यामुळे राजीनामा द्यायचा की नाही, हे धनंजय मुंडे यांनी ठरवावं,’ असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. नेमकं अजित पवार यांना काय सूचवायचं आहे?, असं प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे राजीनामा देणार का?, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अजित पवार यांना सुद्धा या अनुषंगाने प्रश्न विचारले जात होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर थेट भाष्य केलं.

‘आरोप सिद्ध झाले किंवा चौकशीत काही निष्पन्न झालं तरच कारवाई केली जाते. आता तुम्ही प्रश्न विचारलात की २०१० मध्ये माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते. तेव्हा मी राजीनामा दिला होता. मात्र, तो माझा वैयक्तिक निर्णय होता. माझ्या  सद्सत् विवेक बुद्धीला  ते योग्य वाटलं,’ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता धनंजय मुंडे खरंच मंत्रिपदाचा राजीनामा देतील का?, यावर चर्चा सुरू झाली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी दिलेल्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता धनंजय मुंडे स्वतः राजीनामा देतील का, की पक्ष नेतृत्व यावर निर्णय घेईल, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण; फरार आरोपी कृष्णा आंधळे ची संपत्ती जप्त होणार

0

बीड — संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे 65 दिवसापासून फरार आहे.त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती.
ज्यामध्ये कृष्णा आंधळे हा प्रमुख आरोपी होता. पण हत्येच्या दिवसापासून कृष्णा आंधळे हा फरार असून अद्यापही त्याचा शोध पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे आता त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे काही दिवसांपूर्वीच केला होता, तसेच याबाबतची माहिती देखील सादर केली होती. याच बाबत आता कोर्टाने संपत्ती जप्तीचे आदेश दिले आहेत.कृष्णा आंधळे याच्याकडे 5 विविध प्रकारची वाहने असून धारूर व केज येथील बँकेत तीन खाते देखील आहेत. सदरची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, कृष्णा आंधळेच्या संपत्ती जप्त करण्याचे कोर्टाने आदेश दिल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काही महत्त्वाची मागणी केली आहे. उद्या 17 फेब्रुवारी रोजी मस्साजोग ग्रामस्थ एक महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करणे एक प्रक्रियेचा भाग आहे. मात्र, कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करून त्याला फाशी देण्यात यावी. असेही ते म्हणाले आहेत. ज्यावेळेस या प्रकरणातील सर्व आरोपी फासावर लटकतील त्यावेळेस आमचं समाधान होईल. तपास योग्य दिशेने आणि निष्पक्ष पातीपणे चालवा यासाठी आम्ही वेळोवेळी विनंती करत आहोत.’ असेही धनंजय देशमुख म्हणाले आहेत.

सरपंचांच्या पगारात मोठी वाढ, राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

0

मुंबई — महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या संदर्भातील अधिकृत आदेश (जीआर) जारी करण्यात आला आहे.२४ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती

विधानसभा निवडणुकीपूर्वी घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार, राज्यातील २७,९५१ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना दुप्पट मानधन मिळणार होते. मात्र, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी रखडली होती. अखेर, वाढीव मानधन देण्याबाबतचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचे मानधन, तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम यासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षात जानेवारी २०२५ पासून पुढील कालावधीसाठी निधी वितरित करण्यात येणार आहे.यासाठी राज्य सरकारने ३४६,२६,०८,००० रुपयांच्या अनुदानाला आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या १९ महिन्यांच्या किमान वेतनाच्या थकबाकीला मंजुरी दिली आहे.

भेसळयुक्त तेलाच्या फेऱ्यात अडकले शनी महाराज; मंदिर समितीने घेतला “हा” निर्णय

0

अहिल्यानगर — जिल्ह्यातील स्वयंभू पाषाण रूपातील शनैश्चर देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिशिंगणापूर येथे भाविक भक्तांची नेहमीच गर्दी दिसून येते. दरवाजा नसलेला गाव म्हणून देखील हे देवस्थान प्रसिद्ध आहे. दरम्यान याच देवस्थानच्या मंदिर समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी एक मार्चपासून करण्यात येणार आहे.

शनी देवाची शिळा एका चौथऱ्यावर आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे. एका व्यापाऱ्याला नवस पूर्तीचा अनुभव आला त्यामुळे त्याने शिळेभोवती चौथरा बांधला, असे सांगितले जाते. या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका प्रचिलित आहेत. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. शनि शिंगणापुरात शनिदेवाच्या शिळेची झीज होत आहे. शनि देवाच्या स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठी शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यास आणि ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला.

शनैश्वर देवस्थान मंडळाने कोणता निर्णय घेतला आहे?
शिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे. मात्र, तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याचे सांगितले जात आहे. शनिशिंगणापुरात शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी चौथऱ्यावरील तैलाभिषेकासाठी फक्त ब्रँडेड कंपनीचे, शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याने देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला. हा बदल 1 मार्च 2025 पासून लागू करण्यात येत आहे. त्यामुळे 1 मार्चपासून शनिदेवाला सुट्या तेलाऐवजी भाविकांना ब्रँडेड तेलानेच अभिषेक करावा लागणार आहे. भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास असे तेल स्वीकारले जाणार नाही किंवा ते तेल भारतीय अन्नसुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवले जाणार आहे.

दरम्यान, शनि शिंगणापूर हे श्रद्धेचे केंद्र मानले जाते. शनि कृपेची प्राप्ती होण्यासाठी येथे हजारो भाविक तैलाभिषेक करण्यासाठी येतात. शनिशिंगणापूर देवस्थानाने आपला निर्णय जाहीर करताना म्हटले की, साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे शनि देवाच्या शिळेवर परिणाम होत आहे. अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य तेल, सुटे तेल किंवा मिश्रित तेल आणून अभिषेक करत असतात. अन्न व भेसळ तपासणी अहवालांनुसार असे आढळले की, काही तेलांमध्ये भेसळ असल्यामुळे शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होत आहे. त्यामुळे शनिदेवाच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

माजलगावात घरफोडी; 3 लाखाचा मुद्देमाल लंपास

0

माजलगाव — घरात कोणीच नसल्याचे पाहून कुलूप तोडून प्रवेश केलेल्या चोरट्यांनी सोने चांदी सह पावणेतीन लाखाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरुवारी माजलगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात घडली

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर मध्ये राहणारे आसाराम नानाभाऊ कोरडे वय 52 वर्ष यांच्या घरात कोणीच नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटाचे लॉकर तोडून 5 तोळे 2 ग्राम सोन्या, चांदीचे दागिने किंमत 1लाख 79 हजार रु व नगदी 90 हजार रुपये असे दोन लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी घडली. दरम्यान याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार?

0

मुंबई. — येत्या काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला सुरुवात झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काही पक्षांकडून स्वबळाची देखील चाचपणी होत आहे, भाजप देखील स्वबळावर निवडणूक लढू शकतो अशी चर्चा सुरू आहे.

यावर आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले महाजन?

स्वबळाचा नारा मी अजून दिलेला नाही, मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये भाजप 50 टक्क्यांपेक्षा जास्त जागा जिंकू शकते. जळगाव जिल्हा परिषदेमध्ये 70 पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल, मित्र पक्षही आमच्यासोबत असतील. जळगाव ,धुळे, नंदुरबार, नगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्यात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा येण्याची शक्यता आहे. या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे, यावर देखील गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लव्ह जिहाद कायदा हा लागू झालाच पाहिजे. आठ राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे, लव्ह जिहाद कायदा महाराष्ट्रात सुद्धा लागू झाला पाहिजे या मताचा मी आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटातून शिवसेनेत आणि भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे देखील नारज असल्याची माहिती समोर येत आहे. यावर देखील महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘तिकडे एकाच माणसाला संधी आहे, ते म्हणजे संजय राऊत, क्षमतेपेक्षा जास्त ते त्या ठिकाणी बोलत आहेत. क्षमता नसताना सुद्धा बडबड करत आहेत. बाकी लोकांना तिथे कुठेही स्थान नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

राज्य सरकार ॲक्शन मोडवर; लव्ह जिहादविरोधात कायदा करणार

0

मुंबई — मूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार लव्ह जिहाद विरोधात  कठोर पाऊले उचलणार आहे. लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकार आता लव्ह जिहाद विरोधी कायदा आणणार आहे.

यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीचे गठन करण्यात आले आहे.

लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील दहावे राज्य ठरणार आहे.याबाबत कॅबिनेट मंत्री व मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

लव्ह जिहाद प्रकरणे रोखण्यासाठी काम करणारी समिती महिला व संस्कृती रक्षणासाठी काम करेल, असे ठाम मत मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

दरम्यान,महायुती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात महिला व बालविकास विभागाची जबाबदारी असताना मंगल प्रभात लोढा यांनी आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती गठीत केली होती, या समितीच्या माध्यमातून अशा प्रकारच्या घटनांना समोर आणण्यासाठी काम करण्यास मदत होईल.

सुरेश धस धनंजय मुंडेत मांडवली; दोघांच्या साडेचार तासाच्या भेटीमुळे मिळणार कलाटणी?

0

बीड — सुरेश धस व धनंजय मुंडे यांची चार दिवसाआधी एका खासगी रुग्णालयात गुप्तपणे भेट झाल्याचा दावा केला जात असून यामुळे दोघांमध्ये समेट झाल्याची चर्चा रंगली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. विरोधी पक्षासह भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची राळ उठवून त्यांना चांगलेच घेरले होते. धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांची भेट घेऊन मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र आता दोघांमध्ये समेट झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. या दोघांची चार दिवसाआधी एका खासगी रुग्णालयात गुप्तपणे भेट झाल्याचा दावा केला जात असून ही भेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.
संतोष देशमुख हत्या व खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात असून त्याचा आका मुंडे असल्याचे आरोप करत धस यांनी धनंजय मुंडे यांना घेरले होते. बीडमधील दहशतवाद मोडून काढण्याची भाषा करत धस यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती. त्यातच मुख्यमंत्री फडवीस यांचीही त्यांनी भेट घेतली होती. यानंतरही धस यांनी मुंडेंवर आरोप करणे सुरुच ठेवले होते. परंतू, आता या भेटीमुळे धस आणि मुंडे यांच्यातील वैर संपल्याची चर्चा सुरु झाली आहे. मुंडे आणि धस यांची भेट एखा खासगी रुग्णालयात घडवून आणण्यात आल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिल्यानंतर बावनकुळे यांनी ही भेट झाल्याची कबुली दिली होती, मात्र मुंडेंच्या कार्यालयाने अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे सांगून हे वृत्त फेटाळले आहे. या भेटीबाबत बावनकुळे म्हणाले की, आम्ही चार तास एकत्र होतो. सुरेश धस व धनंजय मुंडे यांच्यात भेट झाली. त्यांच्यात मतभेद आहेत मनभेद नाहीत. ते दूर होतील.

दरम्यान धस-मुंडे भेटीवर अंजली दमानिया यांनी म्हटले की, मला हे चार-पाच दिवसांपूर्वी समजलेले. बावनकुळेंनी मध्यस्थी केल्याचे मला सांगितले गेले होते. अशी भेट झाली तर ती खूप दुर्दैवी आहे. धस आता मुंडेंविरोधात लढतील की नाही, काही खरे नाही.
या भेटीबाबत सुरेश धस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, ते म्हणाले की, मी स्वत: धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. तब्येतीची विचारपूस करणं आणि त्यांच्याविरोधातील लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. बीड प्रकरणात मी त्यांच्या विरोधातच राहणार आहे. याचबरोबर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. बावनकुळे यांच्यासोबत भेट झाली का, या प्रश्नावर बावनकुळे यांची माझी आता भेट होईल. बावनकुळे काय म्हणाले ते माहिती नाही. मी परवा मुंडेंच्या घरी गेलेलो. तब्येतीची चौकशी करणे यात गैर नाही. संतोष देशमुख हत्येचा लढा आणि चौकशी यात कोणताही संबंध नाही, असे धस यांनी सांगितले.