केज –केज- अंबाजोगाई महामार्गावरील ढाकेफळ जवळ रस्त्याच्या कडेला शेळ्या चारीत असलेल्या 14 वर्षाच्या लहान मुलाला भरधाव कारने देऊन खड्ड्यात जाऊन पडली. यामध्ये लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंबाजोगाईहून केज मार्गे मांजरसुंबाच्या दिशेने जात असलेली भरधाव कार क्र. एम पी- 09/झेड जी- 2837 वरील चालकाचे नियंत्रण सुटले. यावेळी रस्त्याच्या कडेला शेळ्या चारीत असलेला बाळू हरिदास काळे या चौदा वर्षाच्या मुलाला कारने जोराची धडक ही घटना शुक्रवारी दुपारी 3 च्या घडली धडक दिल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन खड्ड्यात पलटी झाली. यामध्ये बाळू काळे या मुलाचा उपचारासाठी बीड कडे घेऊन जात असताना मृत्यू झाला. या कार मधून प्रवास करणारे मध्यप्रदेश मधील इंदौर जिल्ह्यातील जितेंद्र रघुवंशी आणि हरिसिंग रघुवंशी दोघे जखमी झाले. हरिसिंग रघुवंशी यांच्यावर बीड येथे उपचार करण्यात येत असून जितेंद्र रघुवंशी यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार करण्यात येत आहेत.
भरधाव कारची धडक; शेळ्या चारणाऱ्या मुलाचा मृत्यू
उसने घेतलेल्या पैशासाठी तरुणाचे अपहरण;2 आरोपी पकडले
बीड — अडचणीच्या काळात उसने घेतलेले पैसे व्याजासह द्यावेत यासाठी चौघांनी एका तरुणाचे अपहरण करून मुलगा जिवंत हवा असेल तर 50 हजार रुपये टाका नाहीतर मुलगा दिसणार नाही अशी धमकी दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना पकडले आहे ही घटना धारूर तालुक्यात घडली आहे.
धारूर तालुक्यात 10 हजार रुपये उसने घेतले त्याची तब्बल 80 हजार रुपयांची वसुली करत एका तरुणाचे अपहरण केल्याची घटना समोर आली. दरम्यान, आरोपींनी तरुणाच्या आईला फोन करुन धमकी दिल्याचे समोर आले. “मुलगा जिवंत पाहिजे असेल तर 50 हजार पाठवा, नाहीतर तो कधी दिसणार नाही”, अशी धमकी आरोपींनी दिली.
ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून अपहरण झालेल्या तरुणाचे नाव कृष्णा मैंद असे आहे. कृष्णाने काही महिन्यांपूर्वी धनराज चाटे, पृथ्वीराज राग आणि परमेश्वर आघाव यांच्याकडून 10 हजार रुपये उसने घेतले होते. आरोपींनी या रकमेवर दिवसाला 1 हजार रुपयांचे व्याज लावले होते. याच हिशेबाने व्याजाची रक्कम 80 हजारांवर गेली. पैसे मिळवण्यासाठी कृष्णाचे अपहरण करण्यात आले. अपहरण केल्यानंतर आरोपींनी कृष्णाच्या आईला फोन करून 50 हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर मुलाला सोडणार नाही, अशी धमकी त्या आरोपींनी आईला फोन करुन दिल्याचे म्हटले आहे. तरुणाच्या आईने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी धारुर पोलिसांनी तपास करत अंबाजोगाई जवळील साकुर येथून दोघांना अटक केली आहे. तर दोघेजण फरार आहेत. कृष्णा मैंद असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्यावर सध्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
योग जीवनशैलीचा स्विकार करावा – प्राचार्य डॉ. पंडित खाकरे
चौसाळा – योग हा जीवनशैलीचा भाग आहे. जो आपल्याला अधिक निरोगी आनंदी आणि शांत जीवन जगण्यास मदत करतो असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.पंडित खाकरे यांनी केले कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा येथे राष्ट्रीय सेवा योजने तर्फे जागतिक योग दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी योगगुरु प्रा. डॉ. सुधाकर वनवे , डॉ विलास भिलारे कमविचे उपप्राचार्य प्रा. गणपती ढवळशंख उपस्थित होते पुढे बोलताना प्राचार्य खाकरे म्हणाले की, आचरण शुद्ध ठेवणे, श्वासावर नियंत्रण, शरीराची लवचिकता व लयबद्ध हालचाल ही योगाची चत:सुत्री असून तज्ञ योगगुरू च्या मार्गदर्शना खाली त्याचा नियमित सराव करावा असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी योगगुरू डॉ. सुधाकर वनवे यांनी उपस्थित विद्यार्थी, प्राचार्य व कर्मचारी यांच्या कडून प्राणायाम व आसने यांचा सराव करून घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. अमर आलदे यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. संजय कदम यांनी केले. या साठी क्रीडा विभागाचेही सहकार्य लाभले योगदिन कार्यक्रमासाठी प्राध्यापक, कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.
डंगरंही पिसाटलं; 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने भावजयीचा केला विनयभंग
केज — म्हातारचळ सुटलेल्या 80 वर्षीय डंगराने 70 वर्षाच्या भावजयीचाच विनयभंग केल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे.
. युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक 70 वर्षाची वृद्ध महिला शेतात म्हैस चारीत असताना होती.यावेळी 80 वर्ष वय असलेला दीर तेथे आला.त्याने तिच्याशी म्हैस चारण्याच्या कारणावरून भांडण सूरु केले. शिविगाळ केली. तसेच वृद्ध भावजयीला त्याने गुप्तांग दाखवून तिचा विनयभंग केला.या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारी वरून 80 वर्षाच्या दिरा विरुद्ध युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गु. र. नं. 151/2025 भा. न्या. सं. कलम 74,75,79 अन्वये नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस कांगणे या पुढील तपास करीत आहेत.
शेतकरी कर्ज माफी उपोषण भोवले;बच्चू कडूंचा केला राजकीय गेम
अमरावती — शेतकरी कर्जमाफी प्रकरणावरून उपोषण मागे घेताच
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून अपात्र करण्यात आलं आहे, यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
मला अपात्र केलं त्याची साधी नोटीस देखील दिली नाही, संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न भाजपकडून वारंवार सुरू असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
मला अपात्र केलं त्याची साधी नोटीस देखील दिली नाही, संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न भाजपकडून वारंवार सुरू आहे. अधिकाऱ्यांना देखील विचारलं पाहिजे, ज्याला अपात्र केलं त्यांना नोटीस दिली का? अमरावतीत काँग्रेस प्रणित भाजप आहे. भाजपची सत्ता आणि काँग्रेसचा वापर करून या प्रकरणात मला गोवल्या जातं आहे.
अन्नत्याग आंदोलन मागे घेतल्यानंतर लगेचच अशापद्धतीने कारवाई होते, हे बरोबर नाही. कशा पद्धतीने दबाव तंत्राचा वापर केला जाऊ शकतो, याचं हे उत्तम उदाहारण आहे. या अपात्रतेच्या निर्णयावर आम्ही न्यायालयात जाऊ, न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, विभागीय निबंधक हा एका मंत्र्याचा नातेवाईक आहे. यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहे. अशा पद्धतीने कारवाई होणार हे अपेक्षितच होतं, पण आता आमचं आंदोलन थांबणार नाही, अपात्र केल्याची अद्याप नोटीस नाही, नोटीस आल्यानंतर आम्ही न्यायालयात जाऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शेतकरी कर्जमाफी आणि आपल्या इतर काही मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. सातव्या दिवसी त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. उपोषणाचा सहाव्या दिवशी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली होती. बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवांद साधला. कर्जमाफीसाठी समिती गठीत करण्यात येईल, तिचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीसंदर्भात निर्णय घेऊ असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं होतं. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी देखील बच्चू कडू यांची भेट घेतली, अखेर सातव्या दिवशी बच्चू कडू यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.
गाडी अडवत कोयत्यानं सपासप वार;संतोष देशमुख करण्याची धमकी ,आरोपी मोकाट
बीड — शेतातील बांधाच्या
वादावरून मारहाणीचा प्रकार घडला आहे. ‘तुझा संतोष देशमुख करतो’, अशी धमकी देत भररस्त्यात आरोपीने गाडीवरून जाणाऱ्या तरूणावर कोयत्याने सपासप वार केले. शरीरावर 10 हून अधिक गंभीर वार असल्याची माहिती आहे. तरूणाची स्थिती गंभीर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे इतक्या गंभीर हल्ल्यानंतरही गुन्हा दाखल झाला नाही.
कैलास सांगुळे असं जखमी तरूणाचं नाव आहे. तो बीड तालुक्यातील तांदळवाडी भिल्ल येथील रहिवासी आहे. कैलास गाडी चालवत होता. यादरम्यान, चार जणांनी त्याची वाट अडवली. तसेच कोयत्याने डोक्यावर, मानेवर आणि तोंडावर जबरदस्त हल्ला केला. हल्लेखोरांनी ‘तुझा संतोष देशमुख करतो, याला जीवे मारा’
अशी धमकी देत त्याला मारहाण केली.यानंतर त्याच्या भावाने घटनास्थळी धाव घेत भावाला बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. कैलासवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.यानंतर कुटुंबाने पोलिसांवर गंभीर आरोप करीत आक्रोश व्यक्त केला आहे. आरोपी अद्याप मोकाट असून याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप केला आहे.माझ्या भावाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल अशी प्रतिक्रिया श्रीरंग सांगूळे यांनी देत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
घटती पटसंख्या आणि दर्जा ढासळल्याने 35 शिक्षक निलंबित, 60 जणांना नोटीस
बूलढाणा — जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस घटत चाललेली विद्यार्थी पटसंख्या, शैक्षणिक दर्जा आणि शिक्षकांच्या कार्यशैलीवर सतत निर्माण होणारे प्रश्न याचा अखेर प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, शिक्षण विभागाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे.
या कारवाईमुळे शिक्षक वर्गात खळबळ माजली असून, जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.बुलढाणा जिल्ह्यातील 20 जिल्हा परिषद शाळांमध्ये तपासणी केल्यानंतर, एकूण 35 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच 60 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, यामध्ये शिक्षकांच्या कार्यपद्धती, शाळेतील नियमित उपस्थिती, अध्यापन पद्धतीतील गतीमंदता, तसेच पालक व विद्यार्थ्यांमध्ये असलेला संवादाचा अभाव यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होत चालली आहे. खाजगी शाळांच्या तुलनेत जि.प. शाळांमधील शिक्षणाचा दर्जा खालावल्याने ग्रामीण भागातील पालकही आता आपल्या मुलांना खाजगी शिक्षण संस्थांमध्ये पाठवण्याला प्राधान्य देत आहेत. ही बाब जिल्हा प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या नेतृत्वाखाली गठित विशेष तपासणी समित्यांनी विविध तालुक्यांतील शाळांना अचानक भेटी दिल्या आणि शाळांमध्ये उपस्थित नसलेले शिक्षक, अस्वच्छ परिसर, वेळेवर न होणारा अभ्यासक्रम, आणि विद्यार्थ्यांचा सहभाग कमी असणे यावरून ही धडक कारवाई करण्यात आली.
या कारवाईअंतर्गत 35 शिक्षकांना थेट निलंबित करण्यात आले आहे. हे शिक्षक शाळांमध्ये गैरहजर राहणे, शैक्षणिक जबाबदाऱ्या नीट पार न पाडणे, वेळेवर वर्ग न घेणे आणि विद्यार्थ्यांप्रती निष्काळजीपणा या कारणांवरून निलंबित करण्यात आले आहेत. तसेच 60 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या शिक्षकांना आता आपली बाजू स्पष्ट करावी लागणार असून, समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास त्यांच्यावरही पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.या कारवाईनंतर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांमध्ये संतापाचे वातावरण आहे. काही शिक्षकांनी ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप केला असून, योग्य तपासणी आणि संवाद न होता निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे मत मांडले आहे. तर काही शिक्षणतज्ज्ञांनी प्रशासनाच्या या पावलाचे स्वागत करत म्हटले आहे की, शाळांतील शिस्त आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी अशी कारवाई गरजेची होती.
मुख्याधिकाऱ्यांचा इशारा – दर्जा सुधारला नाही, तर पुढील कारवाई निश्चित
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. शिक्षकांनी आपले कर्तव्य पार पाडले नाही, तर यापुढेही कठोर पावले उचलण्यात येतील.”
अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळा प्रकरणी दहा तलाठी निलंबित
जालना — जिल्ह्यात 2022 ते 2024 या कालावधीत अतिवृष्टी आणि गारपिटीच्या शेतकऱ्यांसाठी मंजूर अनुदानात 34 कोटी 97 लाखांचा अपहार केल्या प्रकरणी 10 तलाठ्यांचे निलंबन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी ही कारवाई केली.
शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीत बनावट शेतकरी दाखवून, तसेच जमीन नसताना आणि एकाच नावावर दोनदा अनुदान लाटल्याचा प्रकार समोर आला होता. यात 26 तलाठी आणि 10 कृषी सहायक आणि ग्रामसेवकांवर ठपका ठेवण्यात आला होता.
या प्रकरणी सर्वच दोषी तलाठ्यांना 48 तासात लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते, ज्यात समाधानकारक उत्तर न मिळाल्याने 10 जणांवर निलंबांची कारवाई करण्यात आलीय. दरम्यान चौकशी समितीकडून इतर खुलासे तपासण्यात येत असून आणखी 10 ते 15 जणांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अनुदानात झालेल्या घोटाळ्यामुळे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अनुदान वाटपात काही घोटाळा झाला आहे का याची चौकशी केली जाणार आहे. या कारवाईने गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
शेतकरी कर्जमाफी:15 दिवसात उच्चस्तरीय समिती; बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन मागे
अमरावती — शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश मिळाले.राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली आहे, तर दिव्यांगांच्या मानधन वाढीसंदर्भात 30 जून रोजी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती देताना सरकार शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. या घोषणेनंतर बच्चू कडू यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.बच्चू कडू यांनी शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी पुकारलेला लढा यशस्वी ठरला आहे. “महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी लढला,” असे कडू म्हणाले. साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या मृत्यूकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला त्यांनी जागे केले. कमी किमतीत सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि महिन्याला केवळ 1500 रुपये मानधन मिळणाऱ्या दिव्यांगांचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या आंदोलनामुळे दिव्यांग बांधवांनी अर्धी लढाई जिंकली असल्याचे कडू म्हणाले. कडूंच्या नेतृत्वाखालील हा लढा कष्टकऱ्यांचा आवाज बनला असून, सरकारला शेतकरी आणि दिव्यांगांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्यास भाग पाडले आहे.
दिव्यांगांच्या मानधन वाढीचे आश्वासन
दिव्यांग बांधवांना सध्या मिळणारे पंधराशे रुपये मासिक मानधन अपुरे असल्याची तक्रार बच्चू कडू यांनी केली होती. यावर सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत 30 जून रोजी यासंदर्भात बैठक घेण्याचे ठरवले आहे. या बैठकीत मानधन वाढीचा निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले. “दिव्यांग बांधवांनी अर्धी लढाई जिंकली आहे,” असे बच्चू कडू यांनी या घोषणेनंतर सांगितले बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी आपला जीव पणाला लावला होता. “महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी लढला, हे या आंदोलनाचे यश आहे,” असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण यावर कोणताही मंत्री बोलत नाही. शेतकरी कमी पैशात सोयाबीन विकतो, पण सरकार याकडे दुर्ल क्ष करते.” त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हितासाठी लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान 51 उपोषणकर्त्यांपैकी एकाची प्रकृती बिघडल्याने चिंता निर्माण झाली होती. मात्र, सरकारच्या सकारात्मक प्रतिसादानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. “पत्रात दिलेल्या आश्वासनांची लवकर अंमलबजावणी होईल,” असे सामंत यांनी आश्वस्त केले.
या आंदोलनाने शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणले आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांमुळे आता सर्वांचे लक्ष समितीच्या स्थापनेकडे आणि 30 जूनच्या बैठकीकडे लागले आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाने सरकारला शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्यास भाग पाडले आहे. सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर 2 ऑक्टोंबरला मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
धनंजय मुंडे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट; जिल्ह्याच्या प्रश्नावर केली चर्चा
बीड — माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आज परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित कामे, प्रस्ताव यांचा विविध महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आज बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये परळी मतदान संघातील तसेच जिल्ह्यातील महत्त्वाच्या विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली.
शिरसाळा येथील मंजूर एमआयडीसी मधील उर्वरित जागेची अधिकरण प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात यावी तसेच या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्मितीच्या अनुषंगाने पाठपुरावा करणे याबाबतही यावेळी चर्चा झाली. त्याचबरोबर बसस्थानकाचे काम, कृषी महाविद्यालयाच्या रस्त्याला निधी, धर्मापुरी किल्ल्याचे काम यांसह जिल्हा स्तरावर प्रलंबित असणारे किंवा जिल्हा स्तरावरून प्रस्तावित करावयाच्या विविध विकासकामांच्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी सूचना केल्या.
यावेळी माजी आ. संजय भाऊ दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर आबा चव्हाण, अविनाश नाईकवाडे, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी, यांसह आदी उपस्थित होते.











