Home Blog Page 68

26 लाख लाडक्या बहिणीं चौकशीच्या फेऱ्यात!

0

मूंबई — मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(ladki bahan Yojana) सुरु होण्यास आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. राज्य सरकारकडून गेल्या वर्षभरापासून 1 कोटी पेक्षा जास्त महिलांना या योजनेच्या माध्यमांतून दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.पण विधानसभा निवडणुकीनंतर(assembly election) या योजनेचे निकष(criteria) तपासले जात आहेत. यामध्ये लाखो महिला या अपात्र असल्याचं समोर आलं आहे. आतादेखील राज्यातील 26 लाख महिला या अपात्र असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलांची आता चौकशी होणार आहे. यासाठी सरकार घरोघरी जावून या महिलांचा शोध घेणार आहे.

विशेष म्हणजे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात नुकताच जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. पण आता लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण राज्य सरकार आता राज्यातील तब्बल 26 लाख लाडक्या बहिणींची चौकशी होणार आहे. राज्यातील 26 लाख महिलांच्या घरी जावून चौकशी केली जाणार आहे.

महिला बालकल्याण विभागाचं जिल्हा प्रशासनाला पत्र

लाडकी बहीण योजनेसाठी विविध निकष ठेवण्यात आले होते. त्या निकषांच्या आधारे लाभार्थी महिलांनी अर्ज दाखल केला होता. आता सरकार घरोघरी जावून लाभार्थी महिलांचे अर्ज आणि पात्रता तपासणार आहे. विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची चौकशी करण्यासाठी महिला बाल कल्याण विभागाकडून जिल्हा प्रशासनाला आदेश देण्यात आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला (district administration)आदेशाचं पत्र देण्यात आलं आहे.

अंगणवाडी सेविका कसा तपास करणार?

जिल्हा पातळीवरील महिला आणि बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही अपात्र लाभार्थी महिला शोधण्याची मोहीम आता सुरु करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत (ladki bahan Yojana)एकाच घरातील दोन पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मात्र दोन पेक्षा जास्त आणि 21 ते 65 वर्षे वयोगटात न बसणाऱ्या तब्बल 26 लाख महिलांना या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती. या महिलांची यादी महिला आणि बालकल्याण विभागाने तयार केली आहे.

अंगणवाडी सेविका असलेल्या एका महिलेने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “दोन प्रकारचे निकष सांगितले आहेत. वयोमर्यादा बरोबर आहेत, बोगस कागदपत्रे भरले आहेत का, अशा प्रकारची तपासणी करा. त्यांचा निर्गम उतारा पाहा, टीसी पाहा, अशा प्रकारची तपासणी करा. घरातील तीन महिला असतील तर दोघांना पात्र करा आणि एकीला अपात्र करा. टॅक्सधारक (tax holder), वाहनधारक (vehicle owner), चारचाकी आहे का, याची तपासणी करा. चारचाकीचा नंबर बघा. याबाबत घरोघरी जावून चौकशी करा, असा आदेश दिला आहे”, अशी प्रतिक्रिया एका अंगणावाडी सेविकेने दिली.

आज खाकी वर्दी ही गहिवरली..! अश्रूंना मोकळी वाट मिळाली..! हरवलेल्या मुलाची आठ वर्षानंतर आईशी भेट झाली

0

AHTU आणि LCB टीमची संयुक्त कार्यवाही…

बीड — दाटलेला कंठ, माया ममतेच्या आनंदाश्रूत पोलीस अधीक्षक कार्यालय (SP office)भावनेच्या लाटेत चिंब झालेलं पाहायला मिळालं. गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी कठोरतेसाठी ओळख असलेली खाकी वर्दीतील माणूसपणाचं दर्शन घडलं. आठ वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेल्या मुलाचा शोध घेऊन तो अडाणी असलेल्या आई वडिलांच्या स्वाधीन केला. माय लेकराची भेट होत असताना अश्रूंच्या आलेल्या महापुरात खाकी ही काही काळ गहिवरल्याचं चित्र दिसलं.
सोळा वर्षाचा अल्पवयीन मुलगा राजु काकासाहेब माळी वर्ष (2017 चे वय) हा घरातून निघून गेला होता. याबाबत माहीती अशी की राजु हा दहावीचे शिक्षण घेण्यासाठी संगमेश्वर विद्यालय नालवंडी (sangameshwar School nalvandi)येथे शिकायला होता . त्याची राहण्याची सोय नसल्याने तो शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांच्या घरी राहत होता. आई वडीलांची परिस्थिती एकदम हलाखीची होती . आई वडील ऊसतोड कामगार असल्याने कर्नाटक राज्यात कामासाठी गेले होते. डिसेंबर 2017 मधे राजु हा शाळा सुटल्यावर कोणाला काही एक न सांगता निघून गेला. याबाबत त्याच्या आई वडिलांना माहिती मिळाली तेव्हा त्यांना कर्नाटक (Karnataka) वरून येण्यास आठ दिवस लागले. राजू चे आई वडिलांना वाटले की राजू काही दिवसात परत येईल, व ते दोघेही अशिक्षित असल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. असे करत पाच ते सहा वर्ष निघून गेले. पण राजु परत आलाच नाही, मग 2023 मधे त्याच्या आई ने पोस्टे पिंपळनेर (pimpalner police)ला गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा जानेवारी 2025 मधे मानवी तस्करी विरोधी पथक(Anti Human Trafficking Unit)ला वर्ग झाला. पीएसआय पल्लवी जाधव यांनी मानवी तस्करी विरोधी पथकाचा पदभार घेतल्यावर या गुन्ह्याच्या फाइल चे बारकाईने अवलोकन केले. आणि तपासास सुरवात केली. राजूच्या आईवडिलांची भेट घेतली त्यांचे अश्रु आणि दुःख खूप वेदनादायक होते. त्यानंतर राजूच्या शाळेत जावून त्याचे शिक्षकांची ही भेट घेतली व त्याच्या बाबत माहिती घेतली. त्यानंतर मागचे पाच वर्ष गुन्हा का दाखल झाला नाही म्हणून शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांची भेट घेतली. कारण सदर शिक्षकाच्या घरी राजू राहत होता, एखादा मुलगा आपल्या ताब्यातून निघून गेल्यावर त्याने गुन्हा दाखल का केला नाही? त्यांनीच राजु चे काही बरेवाईट तर केले नसेल ना असा संशय पीएसआय पल्लवी जाधव यांना आला. मग पीएसआय पल्लवी जाधव यांनी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (SP Navneet Kanvat) यांची भेट घेवून गुन्ह्याबाबत सर्व माहिती सांगितली व सदर शिक्षकावर संशय असले बाबत ही सांगितले. सरांनी सांगितले की तुम्ही पुढील तपासात स्थानिक गुन्हे शाखेची( LCb) मदत घ्या. व तसा आदेश त्यांनी पोनी शिवाजी बंटेवाड एलसीबी यांना दिला. पोनि बंटेवाड यांनी पीएसआय पल्लवी जाधव यांच्या मदतीसाठी पीएसआय श्रीराम खटावकर यांना आदेश दिला. त्यानंतर दोघांनी मिळून तपास सुरू केला. सदर शिक्षकाकडून काही एक माहिती मिळाली नाही. त्यानंतर पीएसआय खटावकर यांनी टेक्नीकल (technical team)टीम च्या मदतीने राजू ची माहिती काढली. मिळालेल्या माहितीवरून राजूचे लोकेशन पुणे (Pune) येथे असल्याचे समजले. व त्याला शोधून विश्वासात घेवून पुणे वरून बीड ला आणले.
आज सकाळी पीएसआय खटावकर यांनी राजू ला पुढील तपासकामी पीएसआय पल्लवी जाधव यांच्या ताब्यात दिले.त्यानंतर त्यास पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या समोर हजर केले. त्यावेळी तेथे राजूचे आई वडील ही हजर होते. त्यांच्यासाठी ही विशेष भेट एस पी नवनीत कांवत यांनी घडवून आणली.
दरम्यान ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव , पोलीस उप निरीक्षक श्रीराम खटावकर , पोलीस हवालदार असिफ शेख, आनंद म्हस्के, हेमा वाघमारे , उषा चौरे, प्रदीप येवले, अशोक शिंदे, पोना अर्जुन यादव, पोलीस शिपाई प्रदीप वीर, योगेश निर्धार सर्व नेमणूक मानवी तस्करी विरोधी पथक(AHTU )व स्थानिक गुन्हे शाखा ( LCB team) यांनी केली. पोलिसांच्या या कामगिरीचं जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

गोसावीं चा “नेक” राहिला नाही “नूर”, वाहतोय अवैध दारूचा महापूर

0

बीड — नेकनूर पोलीस ठाणे (neknoor police) हद्दीत खेडोपाडी (rural area)उघडलेल्या धाब्यांमधून (dhaba)अवैध दारूची सर्रास विक्री केली जात आहे. यामध्ये गोवा राज्यातून (Goa)तस्करी केलेली दारू देखील उपलब्ध होऊ लागली आहे. तीच स्थिती महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गावरील(National Highway) धाब्यामध्ये देखील पाहायला मिळत आहे. यातून पोलीस (police)ठाण्याला मोठी कमाई होत असली तरी गरिबांची घरं उध्वस्त होऊ लागली आहेत. एकूणच ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावींचा नेक नूर राहिला नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
नेकनूर हे पोलीस ठाणं पूर्वीपासूनच कमाईच मोठ ठिकाण मानलं जातं. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत (SP Navneet kavat)सारखा प्रामाणिक अधिकारी जिल्ह्यात आल्यानंतर काही काळ नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांना थोडा लगाम लागला होता. मात्र पोलीस अधीक्षकांचा आपल्या अधिकाऱ्यांवर असलेला विश्वास सध्या तरी धोकेदायक ठरू लागला आहे. याचं सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे नेकनूर पोलीस ठाणे होय. नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर धाबे(dhaba) उघडण्यात आले आहेत. या धाब्यांमधून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होऊ लागली आहे. याला कुठलाही लगाम घालण्याचं काम केलं जात नसल्याने गोरगरिबांची घरं मात्र उध्वस्त होऊ लागली आहेत. तरुण पिढी (young generation)दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊन जीवनाची राखरांगोळी करत असल्याचं सध्या तरी दिसत आहे. मागेल तिथे दारू मिळत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा(law and order) प्रश्न देखील निर्माण झाला आहे. तळीरामांच्या शिव्यांच्या लाखोळीला रस्त्यावरून जाणाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. एकट्या चौसाळा (chausala) शहराचाच विचार केला तर बस स्थानका जवळ चार ते पाच ठिकाणी अवैध दारू तसेच बनावट ताडी मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग असो की राज्य महामार्ग प्रत्येक धाब्यावर दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर दारूचा प्रत्येक ब्रँड (brand)ग्राहकांच्या सेवेला उपलब्ध होऊ लागला आहे. तो देखील दीडपट दराने.दारू विक्रेते मात्र यातून कोट्याधीश होत असले तरी गोरगरिबांची संसार मात्र उध्वस्त होऊ लागली आहेत. या संदर्भात तक्रार करायची तर कोणाकडे हा देखील मोठा प्रश्न आहे. शेतातला माल चोरीला गेला तर त्याची तक्रार नोंदवून घेतली जात नाही गुन्हा दाखल होत नाही. पोलीस अधीक्षकांचा (Sp)फोन गेला गुन्हा दाखल करा म्हणून तरीही त्यांचा आदेश मानला जात नाही. इतकी मग्रुरी ठाणे प्रमुखांकडून दाखवली जाते. या मग्रुरीचा अनुभव चौसाळा परिसरातील फळबाग चोरीच्या घटनेतून जनतेला लिंबागणेश परिसरातून विद्युत पंप चोरीला गेले दोन महिन्यापासून तक्रार दिली याची सुद्धा दखल गोसावी ला घ्यावी वाटली नाही. बरं हे प्रकरण सामाजिक कार्यकर्त्याच्या बाबतीत घडलं होतं. सर्वसामान्यांची परिस्थिती काय असेल हे सांगणं अवघड आहे. विद्युत मोटारी चोरीची बातमी माध्यमामधून समोर आल्यानंतर मात्र गुन्हा दाखल केला. जर ही स्थिती असेल तर अवैध दारूची तक्रार कोण आणि कशी घेणार? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरच गोसावींच्या कारकीर्दीत अवैध दारू विक्रेत्यांसह चोरट्यांना सुगीचे दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे. यातून ठाणे प्रमुखाला मोठ्या प्रमाणावर खळ मिळत असलं तरी सर्वसामान्य जनता मात्र भरडून निघत आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत हे प्रामाणिक अधिकारी असले कर्तव्यदक्ष जरी असले तरी आशा मुजोर अधिकाऱ्यांच्या कर्तबगारिने मात्र पोलीस दलावर शिंतोडे उडले जातात यामुळे अशा धंद्यांना आळा घालावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

केज पोलिसांनी गुटख्याचा ट्रक पकडला; एक कोटीचा मुद्देमाल जप्त

0

केज — केज (Kaij) ते कळंब रोडवरील एचपी पेट्रोल पंपासमोरून अशोक लिलॅन्ड (Ashok Leyland)कंपनीच्या ट्रकमधून अवैध गुटख्याची (gutkha)वाहतूक होत असल्याची माहिती केज पोलिसांना मिळताच छापा(police raid) मारला यावेळी गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एक कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. शुक्रवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत
रईसोद्दीन अमीरोद्यीन शेख वय 50 वर्षे रा. मिल्लतनगर ओकाला रोड ता.जी. रतलाम, राज्य मध्यप्रदेश(Madhya Pradesh) व परशुराम मोहन गायकवाड रा. एकनाथ वाडी ता. पाथर्डी जि अहिल्यानगर हमु. बीड या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर जालिमसिंग (रा. बेहरामपुर, पुर्ण नाव माहीत नाही.रुपेश मालपाणी रा. कळंब जि. धाराशिव हे दोघे फरार आहेत. ट्रक चालक रईसोद्दीन अमीरोद्यीन शेख, परशुराम गायकवाड बेकायदेशीररित्या, महाराष्ट्र राज्यात बंदी घातलेला असताना राज निवास पान मसाला(pan masala), राजनिवास पान मसाला तंबाखु, डायरेक्टर स्पेशल पान मसाला, डायरेक्टर स्पेशल पान मसाला तंबाखु (tobacco) चा माल चोरटी विक्री करण्याकरीता ट्रक क्र. एम. एच.डीडीओ 1 एस. 9442 घेवुन जात असताना केज ते कळंब रोडवरील एचपी पेट्रोल पंपासमोरून (HP petrol pump)पोलिसांनी ताब्यात घेतला. यावेळी 74 लाख 72 हजारांचा गुटखा व 27 लाखांचा टेम्पो असा 1 कोटी 1 लाख, 52 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मांजरमे हे करत आहेत.

अंबाजोगाईत (Ambajogai)रात्रीत चार दुकाने फोडली; व्यापाऱ्यात दहशत

0

अंबाजोगाई — बुधवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या चार ठिकाणी दुकाने फोडून ऐवज लंपास केल्याची घटना घडली. ही सर्व ठिकाणे वर्दळीच्या भागात असूनही चोरट्यांनी हात साफ केल्याने पोलीसांच्या(police) कार्यक्षमतेवर नाराजी व्यक्त होत आहे.
नगर परिषदेसमोर (Municipal Council)असलेल्या मुख्य रस्त्यावरील(Main Street) पॅराडाईज वाईन शॉप (wine shop), प्रशांत नगरमधील डॉ. तट यांचा दाताचा दवाखाना (dental clinic) व बनाळे यांचे किराणा दुकान, तसेच कलावती हॉस्पिटल (hospital)खाली असलेले मेडिकल स्टोअर अशी चार ठिकाणं या चोरट्यांनी लक्ष्य केली. या चोऱ्यांमध्ये नेमका कितीचा ऐवज चोरीला गेला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.पॅराडाईज वाईन शॉपमध्ये स्कॉर्पिओ गाडीतून (Scorpio car )आलेल्या तीन चोरट्यांनी चोरी केली असल्याचे प्राथमिक सीसीटीव्ही फुटेजमधून (CCTV footage)समोर आले आहे.विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरीही चोरी झाली होती. त्या प्रकरणातील चोर अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यातच आता पुन्हा चार दुकाने फोडून चोरट्यांनी पोलीस यंत्रणेलाच थेट आव्हान दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे.दरम्यान गस्तीसाठी पोलिसांची गाडी रात्री फिरते, परंतु इतक्या वर्दळीच्या भागात सलग चार ठिकाणी चोरी होत असताना गस्ती पथक काय करत होते, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.या घटनांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिसांनी तातडीने ठोस कारवाई करून चोरांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.

सासऱ्याचा खून केला जावयाला जन्मठेप

0

अंबाजोगाई —   सासऱ्याच्या खूनप्रकरणी जावयाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असल्याचा निकाल अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या (District and Sessions Court)न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी दिला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड.लक्ष्मण फड यांनी प्रभावी युक्तिवाद सादर करून आरोपीला दोषी ठरवण्यात निर्णायक भूमिका बजावली.
दोन वर्षापूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथे हत्या घडली होती. मृत दत्तात्रय रामा गायके यांची मुलगी रेखा हिचा विवाह रामेश्वर बळीराम गोरे (रा. हिंगणगाव कोथाळा, ता. कळंब, जि. धाराशिव) याच्यासोबत झाला होता. मात्र, लग्न होऊन आठ वर्षांनंतरही दोघांना अपत्य झाले नाही. त्यामुळे रामेश्वरने दुसरे लग्न करण्यासाठी पत्नी रेखावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्यासाठी तिच्या वडिलांनी परवानगी द्यावी, असा तगादा तो लावत होता. या कारणावरून तो रेखाला आणि तिच्या कुटुंबाला मानसिक त्रास देत होता.दरम्यान, मयत दत्तात्रय यांचा मुलगा मल्हारी याचे लग्न ११ जून २०२३ रोजी निश्चित झाले. यामुळे आरोपी रामेश्वरच्या मनात याचा राग होता. दि. ७ जून २०२३ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तो केंद्रेवाडी येथे आला. यावेळी दत्तात्रय हे शेतातील आखाड्यावर झोपले होते. आरोपीने त्यांच्याबद्दल चौकशी केल्यानंतर रात्रीच्या अंधारात आखाड्यावर गाठले आणि धारदार शस्त्राने तब्बल २७ वार करून त्यांचा निर्घृण हत्या केली या प्रकरणी धारूर पोलीस(dharur police) ठाण्यात कलम ३०२ भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमार कुमावत Asp Pankaj Kumar Kumawat यांच्याकडे सोपवण्यात आली. कुमावत यांनी घटनास्थळाचा सखोल तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे न्यायालयात सादर केले.सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये शेजारील शेतकरी बंडू गिरी, लक्ष्मण केंद्रे व तपास अधिकारी पंकज कुमावत यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. ॲड. लक्ष्मण फड यांनी पुरावे (evidence) व साक्षीदारांच्या जबाबांवर आधारित प्रभावी युक्तिवाद सादर केला. त्यांच्या युक्तिवादास मा. न्यायालयाने(court) मान्यता देत आरोपी रामेश्वर गोरे याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या खटल्यात ॲड. अनंत तिडके यांनी सरकार पक्षाला सहाय्य केले.

ऊसतोड कामगाराच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar)

0

बीड — बीड(Beed) जिल्ह्याची ओळख ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आहे. परंतु ऊसतोड कामगारांसाठी विविध कल्याणकारी (welfare scheme)अशा योजना आहेत. ऊसतोड कामगारांचे जीवन सुखकर होऊन त्यांच्या जीवनात स्थिरता, सुरक्षितता निर्माण करण्यासाठी गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापन करण्यात आलेली आहे. या महामंडळाच्या माध्यमातूनही विविध योजना राबविण्यात येतात. त्याचा लाभ सर्व कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री(guardian minister) अजित पवार Ajit Pawar यांनी दिली.
जिल्हा परिषद Zpव सामाजिक न्याय विभागाच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे जिल्ह्यातील ऊसतोड कामगार आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन व मिशन साथी उपक्रमाचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी सर्वश्री आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, प्रकाश सोळंके, सुरेश धस, धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, नमिता मुंदडा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी (collector )विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Ceo)जितीन रहमान आदींसह जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्पवार म्हणाले, कष्टकरी ऊसतोड कामगार स्वाभिमानी आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम शासन करत आहे. बीडमध्ये ऊसतोड कामगाराचे अनेक प्रश्न, समस्या आहेत. त्या दूर करण्यासाठी शासन सदैव त्यांच्या पाठिशी आहे. त्यांच्या प्रत्येक पाल्याला उत्तम शिक्षण मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. ऊसतोड कामगारांसाठी अनेक योजना आहेत. त्यांचा लाभ सर्वांनी घ्यावा, यामध्ये सदस्यांना ओळखपत्र देण्यात येते. केवळ २० रूपयांमध्ये अर्ज करता येतो. संत भगवान बाबा वसतिगृह योजनेंतर्गत २२ वसतिगृह राज्यात मंजूर करण्यात आली आहेत, त्यापैकी १६ वसतिगृह सुरू आहेत. या वसतिगृहांना आर्थिक मदत देण्यासही शासन सकारात्मक आहे. ऊसतोड कामगारांची पुढची पिढी ऊसतोड कामगार राहणार नाही, याची काळजी घेऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यात येईल, असेही पवार म्हणाले.
आजच्या नवतंत्रज्ञानाच्या काळात साधनेही आधुनिक स्वरूपात बाजारात (market) उपलब्ध झालेली आहेत. यांत्रिकीकरण वाढत आहे, त्यामुळे सर्वांना काळानुरूप बदलावे लागेल, असेही ते म्हणाले.
शासनाने सीट्रीपलआयटीच्या माध्यमातून याठिकाणी कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे, यासाठी मदत होणार आहे. या केंद्रातून आगामी काही वर्षात दरवर्षी ७००० कुशल विद्यार्थी निर्माण होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील कौशल्यवर्धक तंत्रशिक्षण व व्यावसायाभिमूख रोजगाराच्या (Skill-enhancing technical education and vocational employment)
संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टी सीट्रीपलआयटी प्रकल्प बीड जिल्ह्यात निर्माण करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी पुढकार घ्यावा शासन निधी देईल, तो सत्कारणी लावावा, असेही ते म्हणाले.
बीड-अहिल्यानगर-मुंबई रेल्वे( Beed -Ahilyanagar -Mumbai railway)लवकरच सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासह बीड शहराजवळ किफायतशीर स्वरूपात विमानतळ (airport)असावे, यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात आरोग्य साथी महिलांना फर्स्ट एड किटचे (प्रथमोपचार पेटी) वाटप करण्यात आले. ऊसतोड कामगारांसाठी उपयुक्त माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘बाल विवाह प्रतिबंधक’ प्रतिज्ञेने समाजातील सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धारही सर्वांनी यावेळी व्यक्त केला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. या कार्यक्रमात ग्रामीण गृहनिर्माण (घरकुल) चॅटबॉट सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. मेळाव्यास उपस्थित सर्व महिलांना पवार यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या.

 रस्ते आणि विकास कामासंदर्भातील आ.क्षीरसागरांच्या मागण्यांना अजितदादांची (Ajit Pawar) सकारात्मकता

0

महामार्गासाठी (highway)भूसंपादन (Land acquisition) झालेल्या शेतकऱ्यांना मावेजा देण्याचीही केली मागणी

बीड — बीड (Beed)विधानसभा (Assembly) मतदारसंघातील रस्ते आणि इतर विकास कामांच्या संदर्भात आ.संदीप क्षीरसागर यांनी अजित दादा पवार (Ajit Pawar)यांच्याकडे मागणी केली असता, ना.अजितदादांनी लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना समोरासमोरच सूचना देऊन बीड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठीची सकारात्मकता स्पष्ट केली.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार २ दिवस बीडमध्ये आलेले‌ आहेत. या दोन दिवसांत अजितदादांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अनेक प्रश्न आणि बाबींकडे बैठकांच्या माध्यमातून नियोजन सुरू केले आहे. या अनुषंगाने गुरूवारी (दि.७) रोजी झालेल्या बैठकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील विकासाचे(development) विविध प्रश्न आणि प्रस्ताव बैठकीत ना.अजितदादांसमोर मांडले असता, ना.अजितदादांनी जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावांच्या संदर्भात सकारात्मक सूचना दिल्या.

ना.अजितदादांनी पुढील कामांबाबत दर्शवली सकारात्मकता

• राष्ट्रीय महामार्ग(National Highway) 211 (नवीन क्र.52) महालक्ष्मी चौक ते जालना रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता या दोन्ही साईडने सहा (6) लाईन रोडसाठी व दोन्ही साईडने ड्रेनेजसाठी मा.अजित दादांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला PWD सूचना दिल्या.

• शिवशारदा ते अमरधाम स्मशानभुमी पर्यंत भुयारी गटारसाठी मा.दादांनी तत्त्वत: सूचना दिल्या.

• ग्रामीण भागातील मुख्य रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्रे  (Primary Health Center) , उपकेंद्रे, शाळा खोली, अंगणवाडी बांधकाम, पाणी पुरवठा(water supply) व्यवस्था, जनसुविधे अंतर्गत स्मशानभुमी बांधकाम, पशु वैद्यकीय दवाखाने (Veterinary clinics) , वन विभागाचा विकास, कोल्हापुरी पद्धतीने बंधरे, सिमेंट नाला बंधारे या व इतर आवश्यक असलेले विकास कामे होणे बाबत आ.क्षीरसागरांनी निवेदनासह मागणी केली असता ना.अजितदादांनी सकारात्मकता दर्शविली.

बीड शहरातील जिव्हाळ्याचा असलेला रस्त्यांचा प्रश्नही मार्गी लावण्याची केली मागणी

बीड( Beed)शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. शहरातील रहदारीसाठी रस्त्यांच्या अवस्थेमुळे मोठी अडचण होत आहे‌. बीड शहरातील रस्त्यांचा प्रश्न हा नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा झाला आहे. त्यामुळे ना.अजितदादांकडे शहरातील रस्त्यांचा विकासासंदर्भात प्रस्ताव देऊन आ.क्षीरसागर यांनी बीड शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
आ.क्षीरसागर यांनी पालवण चौक ते नगर रोड (धानोरा रोड), मदर टेरेसा चौक ते कालिका नगर कमान (अंकुशनगर मुख्य रस्ता), बीड न.प.अंतर्गत प्रभाग क्र. 7 मध्ये बलभीम चौक ते धोंडीपुरा मार्गे माळीवेस सिमेंट रस्ता करणे, बीड न.प.अंतर्गत प्रभाग क्र.8 छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते राजुरी वेस पर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे, बीड न.प.अंतर्गत प्रभाग क्र.08 मध्ये कारंजा टावर ते पिंगळे गल्ली ते बुंदेलपुरा मस्जिद रोड पर्यंत सी.सी. रस्ता व नाली बांधकाम करणे, बीड न.प.अंतर्गत प्रभाग क्र.08 मध्ये राजुरी वेस ते बलभीम चौक व राजुरी वेस बुंदेलपुरा मार्ग कबाड गल्ली पर्यंत सी.सी.रस्ता व नाली बांधकाम करणे, बीड न.प.अंतर्गत प्रभाग क्र.8 मध्ये राजुरीवेस-बुंदेलपुरा-कबाडगल्ली मार्गे माळीवेस सिमेंट रस्ता करणे. या कामांना मंजुरी देण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी ना.अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग(National Highway) ३६१ एफ खरवंडी ते राजूरी (न.) रस्त्याच्या भूसंपादनचाही मांडला प्रश्न

बीड मतदारसंघातून राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफ गेला आहे. या महामार्गासाठी खरवंडी ते राजूरी नवगण पर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. परंतु संपादनाचा शेतकऱ्यांना मावेजा मिळालेला नाही. विकास कामांसाठी शासनाला जमीन संपादित करूनही मावेजावाचून शेतकरी बांधवांचे अतोनात हाल होत आहेत. याबाबत अनेकवेळा पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने ना.अजितदादांनी हा प्रश्न मार्गी लावून जमीन संपादित झालेल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्याची मागणीही आ.संदीप क्षीरसागर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

हरवलेल्या विवेकाच हरित बीड (Beed)अभियान (Campaign)म्हणजे रातभर पाखडलं, काही नाही सापडलं;फसव्या षडयंत्रात दादाचं गाड अडलं

0

बीड — जिल्हा सध्या इव्हेंट(event) आणि स्टंटबाजीच्या विळख्यात सापडला आहे. हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत (Green Maharashtra Campaign )हरित बीडचा इव्हेंट साजरा केला जाणार आहे. एकाच दिवसात तीस लाख वृक्ष लागवड करून देश पातळीवर नवा विक्रम करण्याची विवेकी संकल्पना (Concept) मांडली गेली. उपक्रम (Activities)चांगला आहे प्रत्येक नागरिकाची वृक्ष लागवड ही जबाबदारी आहे. मात्र तुती(Mulberry tree) सारख्या झुडपाला वृक्षाचा दर्जा देऊन स्टंटबाजी केली जात असेल तर बेसरमालाही वृक्षाचा दर्जा दिला असता तर “दिसला खड्डा खव काटूक “मोहीम राबवता आली असती. यातून रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्ड्यांना ही सहभागी होता आलं असतं. खड्डे खणण्याचा खर्चही वाचला असता. तीस लाखच काय तीस कोटी वृक्ष लागवड होऊन जिल्हा ॲमेझॉन (Amazon)जंगलासारखा झाला असता. तूतीला वृक्षाचा दर्जा देऊन केलेला हा इव्हेंट म्हणजे रातभर पाखडलं, काही नाही सापडलं आशाचं इव्हेंट च्या जाळ्यात अजित दादांचं गाड अडल असं म्हणण्याची वेळ आली आहे.जिल्ह्याच्या बदनामीचं हे नव षडयंत्र असल्याचं जनतेत बोललं जाऊ लागला आहे.


जिल्हाधिकारी (collector) विवेक जॉन्सन (Vivek Johnson) जिल्ह्यात आल्यानंतर ते तरुण असल्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेत (Administrative system) बदल होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र इव्हेंट ची जॉन्सन मलमपट्टी करून रडतीचे डोळे पुसण्याचा प्रकार केला जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. प्रामाणिकपणाने वृक्ष संवर्धनाचाच काम करायचा आहे तर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध आरा गिरण्यांकडे (Illegal sawmills)त्यांनी दुर्लक्ष का केले आहे. वन विभागाला आतापर्यंत किती कारवाया केल्या अवैध वृक्षतोडीवर (Illegal logging) का आळा घातला नाही म्हणून धारेवर का धरले नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शेकडो वर्ष जगणारी वृक्षतोड करायला कायदे, चौकशी आदेशाचे लखोटे गुंडाळून बासनात बांधायचे अन दुसरीकडे स्टंटबाजी साठी तूतीला ही वृक्षाचा दर्जा देऊन इव्हेंट साजरा करायचा तोही अजित पवार सारख्या सुजाण नेत्यासमोर हे बीडच्या जनतेला मात्र पचणार नाही. अजित दादा या प्रकारावर जिल्हाधिकाऱ्यांना कानपीचक्या देतीलच अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात आजपर्यंतचा विकासाच्या नावाखाली होत असलेली वृक्षतोड आणि रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांचा विचार केला तर सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा या खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाड लावली. त्यातूनच अधिकाऱ्यांच्या कर्तबगारीने बोडखा झालेला जिल्हा हरित करण्यासाठी जॉन्सनची मलमपट्टी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी तुतीला जसा वृक्षाचा दर्जा दिला तसा बेसरमालाही दिला असता तर वेगळे खड्डे खांदून सरकारी तिजोरी रिकामी करायची वेळ आली नसती. आयत्या रस्त्यावरच्या खड्ड्यावरच बेशरमाचं काटुक खवून विक्रमाचा इव्हेंट साजरा करता आला असता. तीस लाख काय तीस कोटी वृक्ष लागवड देखील एकाच दिवसात पार पडली असती. महिना दीड महिन्यात ॲमेझॉन (Amazon)जंगलात स्वरूप जिल्ह्याला प्राप्त झालं असतं. हा एक नवा जागतिक विक्रम (world record)जिल्ह्याच्या नावावर नोंदला गेला असता. तीन वर्षानंतर तुतीची झाडं शेतकऱ्यांनी तोडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या विवेकी जॉन्सन मलमपट्टीने जिल्हा पुन्हा बोडखा होणार नाही काय? विक्रमासाठी तुतीची झाड, कापसाची झाड वृक्ष म्हणून गणतीत धरायची काय? जर ती धरायची तर बेसरमाच्या झाडांनीच काय घोडं मारलं? कमीत कमी अजितदादा (Ajit Pawar) आपल्यासारख्या जमिनीवर पाय असणाऱ्या नेत्यांनी तरी आशा इव्हेंटला बळी पडायला नको एवढीच जनतेकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अजित दादा..! महावितरणचे (mahavitran)कॉन्ट्रॅक्टर (contractor) जळूसारखं शोषण करू लागले; हक्काचा पगार मागताच कवठेकर सारखे कर्मचाऱ्यांना धमकावू लागले

0

बीड — जिल्ह्यातील महावितरण(mahavitran) ला कॉन्ट्रॅक्टर(contractor) चे जळू(leech) असे चिकटले आहेत की, सामान्य जनतेसह महावितरणचे शोषण ( Exploitation) करू लागले आहेत. याला महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांसह अधिकारीही पांघरून घालत आहेत. यामध्ये मात्र जीवावर उदार होऊन काम करणारे बाह्य स्त्रोत कंत्राटी कर्मचारी चांगलेच भरडले जात आहेत. त्यांच्या मासिक वेतनावर कॉन्ट्रॅक्टर दरोडे तर घालत आहेतच शिवाय अन्यायाला वाचा फोडण्याच काम केलं तर कवठेकर सारखी मस्तवाल माणसं कंत्राटी कर्मचाऱ्यांना धमकावण्याचं काम करत गुन्हेगारी मनोवृत्तीचा प्रकाश पाडत आहेत.याची ऑडिओ क्लिप(audio clip) सध्या समाज माध्यमावर(social media) व्हायरल होत आहे ‌ आशा राजकीय अभय मिळालेल्या मस्तवाल गुत्तेदारांना अजित पवारांनी आळा घालावा अशी मागणी होऊ लागली आहे.
महावितरण ची ग्राहकापर्यंत वीज पुरवणारी यंत्रणा बाह्य स्त्रोत कंत्राटी कामगारां मार्फत राबवली जात आहे. कंत्राटी कामगार असले जीविताची व पोटाच्या भविष्याची काळजी न करता प्रामाणिकपणाने सेवा देण्याचं काम कंत्राटी कामगार करत आहेत. बऱ्यापैकी महावितरण (mahavitran)या कर्मचाऱ्यांना वेतनही देत. तुटपुंज्या रकमेत जगणं अवघड असलं तरी कमी मोबदल्याचा परिणाम कर्तव्यावर कधीच होऊ दिला नाही. मात्र जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या या बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांच आर्थिक मानसिक शोषण कॉन्ट्रॅक्टर करू लागले आहेत. जळू नावाच्या किड्याचा तरी आयुर्वेदामध्ये (ayurved)फायदा होतो रक्त शोषण करणे या जळूचं (leech) काम असतं. पण महावितरण ला चिटकलेले जळू (leech)महावितरण (mahavitran)सहित सर्वसामान्य जनतेचे कर्मचाऱ्यांचं शोषण( Exploitation) करू लागले आहेत. बीड मधील तेजस इलेक्ट्रिकल सप्लायर्स(Tejas electrical suppliers)या कंपनीला मे महिन्यापासून बाह्य स्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांच टेंडर(tender) देण्यात आला आहे. मे महिन्यामध्ये महावितरणच्या संपर्क पोर्टलनुसार 19 हजार 46 रुपये वेतन देण्यात आल्याचे सांगितले. प्रत्यक्षात तेजस इलेक्ट्रिकल्स सप्लायर्सने कर्मचाऱ्यांना 16 हजार 995 इतकीच रक्कम कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवून दिली. प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मागे 2051 रुपयाचा दरोडा तेजस सप्लायर्स ने टाकला‌. मे, जून, जुलै असा तीन महिन्याचं वेतन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अजूनही थकीत आहे. तीन-तीन महिने उपाशीपोटी काम करायचं, संसारीक अडचणी सोडवायच्या कशा म्हणून हातबल झालेल्या कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. ही बाब कॉन्ट्रॅक्टर प्रकाश कवठेकर याला कळताच कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकावण्याचे काम त्याने केलं. याची ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. प्रकाश कवठेकर हा कॉन्ट्रॅक्टर सध्या गोरगरिबांचा अन्याय अत्याचार पीडितांचे कैवारी म्हणून राज्यभर आवाज उठवणाऱ्या आष्टीच्या (asthi)आमदाराच्या छत्रछायेखाली अशी काम करत आहे. आशा मस्तवाल गुत्तेदारांना पाठीशी घालण्याचे काम महावितरणचे वरिष्ठ अधिकारीही तितक्याच प्रामाणिकपणाने करत आहेत. अजित दादा जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात बाह्य स्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ( External source contract staff) हाकेला ओ देऊन त्यांच्या वेदना समजून घेत त्यांना न्याय द्यावा मुजोर कॉन्ट्रॅक्टर सह महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.