जालना — मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबई हायकोर्टाने काल आझाद मैदान इथं आंदोलन करण्यास परवानगी नाकारल्यानंतर आज पोलिसांनी काही अटी-शर्तींसह जरांगे पाटील यांना उपोषण करण्यास परवानगी दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या Maratha reservation प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या महामोर्चाला mahamorcha अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. अंतरवली सराटीतून बुधवारी (दि.२७) सकाळी साडेदहा वाजता मराठा समाजबांधवांचा भव्य मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला.मंगळवारपासूनच हजारोंच्या संख्येने समाजबांधव अंतरवलीत दाखल झाले होते.

ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मोर्चाचा ताफा वडीगोद्री फाटा येथे पोहोचला असता, गाड्यांचा आणि पायी चालणाऱ्या समाजबांधवांचा प्रचंड लोंढा पाहायला मिळाला. सोलापूर-धुळे महामार्गाच्या डाव्या बाजूला दोन ते तीन किलोमीटरवर गाड्यांची अखंड रांग होती. अवघे दहा किलोमीटर अंतर पार करायला तब्बल तीन तास लागले. याबरोबरच मराठवाड्यातील ग्रामीण भागासह राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग मोर्चेकऱ्यांच्या गाड्यांनी फुलून गेलेला दिसला. घोषणा ढोल बाजा यांच्या मदतीने उत्साह दुगुनीत होत असल्याचं पाहायला मिळालं. यावरून महामोर्चाची भव्यता लक्षात घेण्यासारखी आहे. हे झालं आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजाची पण यामध्ये राजकीय नेत्यांची देखील मोर्चात रीघ लागल्याचे चित्र पाहायला मिळालं. बीड जिल्ह्यातून आ. संदीप क्षीरसागर Sandeep kshirsagar यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा आवाहन काल केलं होतं त्यांनी देखील या मोर्चाला पाठिंबा देत सहभाग घेतला आहे. गेवराईचे आमदार विजय राजे पंडित Vijay Raje pandit यांनी देखील आरक्षण लढाईला नेहमीच पाठबळ दिला आहे. चलो मुंबईचा नारा पंडित यांनी दिला. माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके Prakash Solanki यांनी देखील आंदोलनात सहभागी होणार असल्याची भूमिका घेतली. याबरोबरच खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील चलो मुंबईचा नारा देत आझाद मैदानावर Azad maidan होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणारा असल्याची घोषणा केली आहे. धाराशिव कळंब मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी देखील समाज माध्यमातून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. धाराशिव चे खा. ओमराजे निंबाळकर यांनी देखील सरकारने तात्काळ तोडगा काढावा असं आवाहन करताना जनतेला सहभागी होण्याची हाक दिली. जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य देखील मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झाले आहेत.

दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाला आझाद मैदान एक दिवसासाठी आंदोलनासाठी खुले करण्यात आले आहे .
शासकीय सुट्टीच्या दिवशी व शनिवारी आणि रविवारी आंदोलनाला परवानगी देण्यात येणार नसल्याचं या आदेशात म्हटलं आहे. तसेच आंदोनासाठी कमाल पाच हजार आंदोलकांची अट घालण्यात आली आहे. दरम्यान यावर आता मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. आपण सर्व अटी आणि नियमांचं पालन करणार मात्र आंदोलन बेमुदत होणार असं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील? Jarange Patil
लोकशाहीचं कायद्याचं सर्व नियामांचं आम्ही पालन करणार, माझा समाज देखील पालन करणार. आम्ही हट्टी नाहीयेत. तुम्ही जे सांगितलं आहे, त्या निर्णयाचं मराठ्यांकडून तंतोतंत पालन होणार, पण आम्ही एक दिवसाचं आंदोलन करणार नाही आम्ही बेमुदत आंदोलन करणार. बाकीच्या त्यांच्या सर्व नियमांचं आम्ही पालन करणार, त्यावर मी आता प्रतिक्रिया देत नाही. मी आधी ऑर्डर बघतो आणि नंतर त्यावर प्रतिक्रिया देतो, परवानगी दिल्याबद्दल सरकारचे आणि न्यायालयाचे आभार मानतो. पण आंदोलन एक दिवसाचं नाही तर बेमुदत होणार, एक दिवसाची परवानगी दिली तर करा मग एक दिवसात आरक्षण मंजूर, तुम्ही जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणार, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

