Sunday, December 14, 2025

Maratha reservation:आझाद मैदानात उपोषण करण्यास हायकोर्टाची मनाई; सरकारला निर्देश

मुंबई — मराठा आरक्षणप्रश्नी Maratha reservation मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांना मुंबईतील आझाद मैदान Azad maidan येथे उपोषण आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टाने High court मंगळवारी मनाई केली. तसेच नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

              मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे Manoj jarange यांची डोकेदुखी वाढली असून ते पुढे काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सव Ganesh festival  काळात मुंबईत उपोषणाला येणं टाळावं, अशी विनंती करण्यासाठी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र साबळे हे अंतरवाली सराटी इथं दाखल झाले होते. राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत याबाबत चर्चाही केली. मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण OBC reservation मिळाल्याशिवाय आता माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका या भेटीनंतर जरांगेंनी मांडली. आम्ही मुंबईला निघण्याआधी सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, तरंच आम्ही माघार घेऊ, असं जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. परंतु आता हायकोर्टानेच मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केल्याने मनोज जरांगेंची कोंडी होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles