बीड — बुधवार दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अंबिका चौकामध्ये सा.शिवसुर्य तथा मराठी महाराष्ट्राचे संपादक संग्राम धन्वे यांना दोन अनोळखी तरुणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. संपादक संग्राम धन्वे यांच्या फिर्यादीवरून बीड शहरातील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी आहे की दि.२५ डिसेंबर २०२४ रोजी बीड शहरातील अंबिका चौक येथे वाहतूक शाखेच्या वतीने ध्वनिप्रदूषण कमी करण्याच्या कारणाने दुचाकी रॉयल इनफील्ड. एम.एच. १४ बी. डब्ल्यु ६३०३ या (बुलेट) च्या कर्कश आवाजाने सायलेंसर काढून घेण्याची कारवाई सुरू असताना पत्रकार संग्राम धन्वे हे अंबिका चौकतून जात होते पोलिसांची कारवाई सुरू असल्याचे निदर्शनास आले.
ती कारवाई सुरू असल्याचे पाहून संग्राम धन्वे यांनी सदरील कारवाईचे बातमीकामी व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यानंतर सदरील दुचाकीवरील दोन तरुण धाऊन आंगावर आले आमच्या गाडीची व्हिडीओ का काढतो म्हणत धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यावेळी वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरिक्षक सानप व वाहतूक शाखेचे कर्मचारी वाघमारे हे उपस्थित होते. त्या अधिकाऱ्यांनी संग्राम धन्वे यांना सुरक्षा दिली असे संग्राम यांनी सांगीतले.मात्र गर्दीचा फायदा घेत त्यांनी पत्रकार धन्वे यांना मारहाण केली. तर दूचाकी स्वार जाता जाता असेही म्हणाले की पोलीस असल्यामुळे तू वाचला तू बाहेर ये तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत सदरील तरुण दुचाकीवर बसून निघून गेले.
त्यामुळें संग्राम धन्वे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र राज्यातील प्रसार माध्यमातील व्यक्ती आपली कर्तव्ये पार पाडत असताना त्यांच्यावर होणाऱ्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि प्रसारमाध्यमातील व्यक्ती किंवा प्रसारमाध्यम संस्था यांच्या मालमत्तेचे नुकसान किंवा हानी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम १७ नुसार तसेच भारतीय न्यायिक संहिता (BNS), 2023 115(2) भारतीय न्यायिक संहिता (BNS), 2023 352,भारतीय न्यायिक संहिता (BNS), 2023 351(2),भारतीय न्यायिक संहिता (BNS), 2023 351(3), भारतीय न्याय साहित्य (BNS), 2023 ३(५) या कलमानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक बोल्डे यांच्याकडे आहे. दरम्यान याप्रकरणी आरोपींना अटक करावी अशी मागणी पत्रकारांकडून केली जात आहे.