बीड — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे जाणते राजे पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार साहेबांच्या ८४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने बीडमध्ये जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिकांनी गुरूवारी (दि.१२) रोजी राष्ट्रवादी भवन येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार साहेब यांचा ८४ वा वाढदिवस गुरूवारी (दि.१२) रोजी आहे. पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बीडमध्ये राष्ट्रवादी भवन येथे सकाळी ११:०० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ८४ उत्कृष्ट विद्यार्थी, ८४ जेष्ठ नागरिक, ८४ विशेष कार्य केलेल्या महिला यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासोबतच विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. या कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.