Tuesday, December 3, 2024

आ.संदीप क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज दाखल

महापुरूषांना अभिवादन करून साध्या पद्धतीने अर्ज केला दाखल
बीड — बीड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.२८) रोजी अगदी साध्या पद्धतीने सर्व महापुरुषांना अभिवादन करून, बीड शहरातील देवस्थानांचे दर्शन घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
                बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना दुसर्‍यांदा विधानसभा निवडणुकीत संधी मिळाली आहे. आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.२८) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपला अर्ज अगदी साध्या पद्धतीने दाखल केला. सर्वप्रथम आपल्या नवगण राजूरी गावचे ग्रामदैवत श्री मंगलमूर्ती देवस्थान येथे दर्शन घेतले. त्यानंतर आपल्या आई स्व.रेखाताई क्षीरसागर, त्यांच्या राजकीय गुरू असलेल्या त्यांच्या आजी स्व.केशरकाकू व नाना तसेच बीड जिल्ह्याचे भूमिपूत्र दिवंगत स्व.विनायकराव मेटे साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर बीड शहरातील देवस्थान श्री कनकालेश्वर, हजरत शहेंशाहवली दर्गा, हजरत मन्सूर शाहवली दर्गा, श्री शनि मंदीर येथील दर्शन घेतले. त्यानंतर आ.क्षीरसागर यांनी शहरातील मॉंसाहेब जिजाऊ, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राष्ट्रसंत भगवान बाबा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे, महात्मा बसवेश्वर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, राष्ट्रसंत गाडगेबाबा, शिवरत्न जिवाजी महाले, महाराष्ट्रातील कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब, स्व.द्वारकादास मंत्री साहेब यांना आ.संदीप क्षीरसागर यांनी अभिवादन केले‌.
         दरम्यान सर्व महापुरुषांना अभिवादन केल्यानंतर आ.क्षीरसागर यांनी, बीड विधानसभा मतदारसंघ निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खा.बजरंग सोनवणे, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.उषाताई दराडे उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles