ताज्या घडामोडी

सडकून टीका होताच केंद्राने कांदा निर्यात बंदी उठवली

नवी दिल्ली — गुजरातच्या कांद्याला निर्यातीला परवानगी दिल्यानंतर विरोधकांच्या कोंडीत अडकलेल्या केंद्र सरकारने अखेर कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. 99 हजार 150 मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. एकूण 6 देशांमध्ये कांदा निर्यात केला जाणार आहे. बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रातील लाल कांद्याला निर्यातबंदी असताना गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची निर्यात केंद्र सरकारने खुली केली होती. त्यानंतर विरोधकांनी या मुद्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. दरम्यान आज केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.तर राष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याची वाढलेली मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कांदा निर्यात सुलभ होण्यासाठी नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) ही एजन्सी नियुक्त केली आहे.एनसीईएल स्पर्धात्मक किमतीत ई-प्लॅटफॉर्मद्वारे देशांतर्गत उत्पादकांकडून कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे. 100 टक्के आगाऊ पेमेंट देऊन कांद्याचा पुरवठा गंतव्य देशांच्या नामांकित एजन्सी किंवा एजन्सींना वाटाघाटीनुसार दराने केला जाईल. याव्यतिरिक्त, सरकारने 2000 मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला आधी परवानगी दिली आहे

मुख्य संपादक उपेंद्र कूलकर्णी

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button