ताज्या घडामोडी

बीडच्या तीन पोलिसांना महासंचालक पदक

बीड — बीडच्या पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक व दोन पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे. एक मे रोजी पोलीस मुख्यालयावर त्यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.

दंगल नियंत्रण पथकाचे प्रभारी अधिकारी महादेव ढाकणे, वाहतूक शाखेचे विष्णू काकडे, दत्तात्रय दुधाळ यांचा यात समावेश आहे.
बीड शहर पोलीस ठाणे तसेच अंभोरा पोलीस ठाण्यात महादेव ढाकणे यांनी प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे गेल्या अनेक वर्षापासून अंगरक्षक म्हणून दत्तात्रय दुधाळ यांनी कर्तव्य बजावलेले आहे.त्यानंतर विष्णू काकडे यांनी देखील वाहतूक शाखेत उत्कृष्ट कार्य केलेले आहे.
या तिघांनीही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यामुळेच त्यांना पदक जाहिर झाले आहे. एक मे रोजी पोलिस मुख्यालयावर सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन यांचा गौरव करण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर आदींनी त्यांचे स्वागत केले आहे.

मुख्य संपादक उपेंद्र कूलकर्णी

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button