शिरूर — पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील श्री क्षेत्र निरंजन संस्थानचे महंत ह. भ. प. श्री.कृष्णा महाराज शास्त्री यांची श्री क्षेत्र भगवानगडाचे चतुर्थ उत्तराधिकारी (महंत) पदी श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी त्यांचा पुढील उत्तरधिकारी म्हणून कृष्णा महाराज शास्त्री यांची निवड केली आहे.असून त्यांना सोमवारी एकनाथवाडी या ठिकाणाहून ग्रामस्थांनी सकाळी ८ वाजता रथामध्ये बसवून ढोल ,ताशा, टाळ, मृदंग, हरी नामाचा जयघोष करत महिला भगिनी व पुरुष मंडळी हातामध्ये झेंडे, पताका घेऊन कृष्णा महाराज यांना भगवानगडावरती पोहोचवले. एकनाथ वाडी पासून निघाल्यानंतर रस्त्यामधील मुंगसवाडे, श्रीपतवाडी ,मालेवाडी, खरवंडी कासार, किर्तनवाडी या ठिकाणी कृष्णा महाराज शास्त्री यांचे लोकांनी भव्य असे स्वागत करण्यात आले. रस्त्याने जिकडे तिकडे गर्दीच गर्दी होती. ठिकठिकाणी जेसीबीच्या साह्याने फुलाचा वर्षावही करण्यात आला. श्री संत भगवान बाबा की जय, नामदेव महाराज शास्त्री की जय अशा घोषणा देत सर्व भाविक मंडळी भगवान गडाकडे पायी वाटचाल करत होती.
कृष्णा महाराज यांच्या विषयी सांगायचे म्हणजे त्यांचे मूळ गाव तेलंगणा असून ते बारा वर्षांपूर्वी भगवानगडावरती आले. ज्ञानेश्वरी चे संपूर्ण शिक्षण भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठामध्ये झाले. त्यांचे
एम ए पर्यंतचे शिक्षण झालेले आहे. त्यांनी बारा वर्षे ज्ञानेश्वर चे संपूर्ण शिक्षण डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडून घेतले आहे. त्यांना तीन वर्षांपूर्वी एकनाथवाडी येथील निरंजन संस्था या ठिकाणी महंत म्हणून राहिले आहेत. भगवान गडावरील उत्तराधिकारी या विषयीचे ऑफिसिली ठराव झालेले आहेत. गडावरती श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या मंदिराचे काम सुरू असून ते काम 2026 ला पूर्ण होणार आहे. त्याच वर्षी भगवानगडाचा अमृत महोत्सव असून या अमृत महोत्सवामध्ये नवनियुक्त महंत कृष्णा महाराज शास्त्री यांना गादीचे हस्तांतर करण्यात येईल असे डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितले. पुढील काळामध्ये कृष्णा महाराज शास्त्री हे भगवानगड व भगवानगडाचा विकास करतील याचा संपूर्ण विश्वास मला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच मी कृष्णा महाराज शास्त्री यांची निवड केली आहे. भविष्यामध्ये अशाच माणसाची गरज भगवानगडाला आहे. अशा पद्धतीचा शब्दही त्यांनी मला दिला आहे, असे यावेळी शास्त्री यांनी सांगितले. एकनाथवाडी ग्रामस्थांनी कृष्णा महाराज शास्त्री अचानक गडावरती नियुक्त झाल्यामुळे त्यांच्यामध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले. परंतु एकीकडे त्यांना आनंद झाला.
यावेळी दोन ते तीन हजार महिला भगिनी, पुरुष मंडळी, संत मंडळी हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजता कृष्णा महाराज हे भगवानगड वरती पोहोचल्यानंतर भगवानगडाचे प्रधान आचार्य नारायण स्वामी जी महाराज यांनी एकनाथवाडी ग्रामस्थ यांचे भगवान बाबांची प्रतिमा देऊन स्वागत केले. या स्वागतावेळी भगवानगडाचे संपूर्ण विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.