डीपीसीतून ६ कोटींचा निधी; ना.धनंजय मुंडे यांचे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मानले आभार
बीड — शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी डीपीसीतून ६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातून २५० सोलर हायमास्ट बसविण्यात येणार असल्याने शहर उजळणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यातून निधी मिळाला असून पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे भरीव निधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड विधानसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागासाठी कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. त्यातील अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. अलिकडे शहरातील अनेक भागात पथदिवे बंद असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. हे पथदिवे सुरू करून अंधार दूर करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. या मागणीची दखल घेऊन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर डीपीसीतून ६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून त्यातून २५० सोलर हायमास्ट बसविण्यात येणार आहेत. तसेच, शहरातील अनेक जुन्या पोलवरील एलईडी पथदिवे बंद आहे. त्याठिकाणी देखील एलईडी पथदिवे बसविले जाणार आहेत. या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून दिवाळीच्या आधीच बीड शहर उजळणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
बीड मतदारसंघात कोट्यवधींची कामे सुरू
बीड विधानसभा मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे प्रत्यक्षात सुरू आहेत. अनेक कामे पूर्णत्वास गेली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. रस्ते, नाल्या, पथदिव्यांसह विजेची कामे, सभागृह, अंगणवाडी, दवाखान्यांसह विविध दुरुस्तीच्या कामांचा देखील यामध्ये समावेश आहे. या कोट्यवधींच्या विकासकामांसाठी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला आहे.