रा.काँ.चे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश, डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांचा स्तुत्य उपक्रम
बीड — तालुक्यातील मांजरसुंबा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांच्या पुढाकारातून रविवारी (दि.२२) मोफत आरोग्य शिबीर पार पडले. या शिबिरात ९३२ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.योगेश क्षीरसागर होते. प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प.विष्णुदास महाराज सुरवसे, डॉ.सारिकाताई क्षीरसागर, माजी पंचायत समिती सभापती काकासाहेब जोगदंड, मांजरसुंबाचे सरपंच अरुण रसाळ, उपसरपंच शेख पप्पू, अच्युतराव रसाळ, मोहनराव रसाळ, बालासाहेब जाधव, आमेर सिद्दिकी, शुभम कातांगळे, संदीप इंगोले, संदीप कदम, बाबासाहेब खिल्लारे, महादेव खोसे, शंकर चव्हाण, शिवाजी येडे, रामकिसन कदम, समीर शेख, प्रकाश मांडवे, विष्णुपंत मेंगडे, शहाजी घोडके, राजाभाऊ क्षीरसागर, माजेद कुरेशी, मिलिंद ठोकळ, फुलचंद येडे आदींची उपस्थिती होती. या शिबिरात हृदयाची अन्जिओग्राफि, कॅन्सर शस्त्रक्रिया, अजिओप्लास्टी, मुत्रमार्ग शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, स्त्रियांचे आजार अशा १७ आजारावर निदान व मोफत उपचार केले जाणार आहेत. या आरोग्य शिबिरात पंचक्रोशीतील नागरिक व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, डॉक्टर क्षीरसागर दाम्पत्याच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
३४५ जणांना चष्मे वाटप; २१ जणांचे रक्तदान
मांजरसुंबासह पंचक्रोशीतील ९३२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी ३४५ जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच, १७५ जणांची रक्त तपासणी मोफत केली. याच आरोग्य शिबिरात २१ जणांनी रक्तदान केले. आवश्यकतेनुसार सोयीसुविधायुक्त रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया मोफत करून दिल्या जाणार आहेत.