- बीड — स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे सापळा रचून एका इसमाला तब्बल ३३ किलो गांजासह रंगेहाथ पकडले. या कारवाईत गांजा आणि दुचाकीसह एकूण ७ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक इसम बजाज मोटार सायकलवरून गांजा विक्रीसाठी पात्रुड (ता. माजलगाव) येथे येत आहे. या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्या पथकाने पात्रुड परिसरात सापळा लावला. संशयित दुचाकी येताच पोलिसांनी अडवून झडती घेतली. त्याच्याकडे असलेल्या सॅक मध्ये ३३ किलो गांजा मिळून आला.
पकडलेल्या आरोपीचे नाव सय्यद अत्तार रहेमान सय्यद नौमान वय ३५ वर्षे, रा. परळी, जि. बीड असे आहे. आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ७ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७/२०२६ नुसार कलम ८ (क) आणि २० (ब) गुंगीकारक औषधी द्रव्य, मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ करत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आणि पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पीएसआय सुशांत सुतळे, हवालदार मारोती कांबळे, सुनील अलगट, रामचंद्र केकान, गोविंद भताने, सचिन आंधळे, बिभीषण
चव्हाण आणि चालक अतल हराळे यांचा सहभाग होता.

